Alcohol truck accident: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. देशभरात दररोज कुठे ना कुठे अपघात तर घडतच असतात. त्यापैकी काही अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून काही वेळेस दु:ख होतं; तर काही वेळेस हसू येतं. परंतु, हा व्हिडीओ पाहून नेमकं काय करावं? हेच तुम्हाला कळणार नाही. दारू वाहून नेणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रक अक्षरश: उलटा झाला आहे; परंतु लोकांनी त्या चालकाला मदत करण्याऐवजी चक्क दारूच्या बाटल्या गोळा करण्यास सुरुवात केली. या घटनेचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला असून, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

दारुचा ट्रक रस्त्यावर पलटी

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी

काही मद्यशौकिनांना मदिरेचा मोह काही आवरत नाही. मग मद्यासाठी समोर आलेली कोणतीच संधी ते सोडत नाहीत. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर मद्याच्या बाटल्याच बाटल्या दिसून येत असून, मद्य लुटण्यासाठी लोकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येतेय. हे चित्र फारच धक्कादायक आहे.

मदत करण्याऐवजी दारूच्या बाटल्या पळवल्या

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून दारूच्या बाटल्या घेऊन जाणारा एक ट्रक उलटला. त्यामुळे रस्त्यावर मद्याच्या बाटल्यांचा ढीग पडल्याची बातमी आजूबाजूच्या परिसरात समजली आणि फुकटचे मद्य पळवण्यासाठी लोकांनी तिथे गर्दी केली. या मोफतच्या मद्यामुळे या भागातील तळीरामांची चंगळ झाली. लोकांनी मद्याच्या बाटल्या पळवण्यासाठी तोबा गर्दी केली. ट्रक उलटल्यावर त्यातील मद्याच्या बाटल्या खाली पडल्याचे पाहून तळीरामांनी चांगलीच संधी साधली. या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं अन् अपघात झाला. हा ट्रक अक्षरश: पलटी मारून खाली पडला. पण, आश्चर्याची बाब म्हणजे लोकांनी अपघातग्रस्त चालकाला मदत करण्याऐवजी फुकट मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या पळवण्यात धन्यता मानली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्ही पाहू शकणार नाही असा VIDEO; शिक्षिकेने २० सेकंदात मुलाला ७ वेळा मारली कानाखाली; कानातून रक्त आले अन्…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण झाले आहेत. @vimlesh.kumar11330 नावाच्या युजरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओवर लोकांनी आपला संतापही व्यक्त केला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, चालकाला मदत करण्याऐवजी लोक मद्य लुटण्यात गुंतले आहेत.”

Story img Loader