List of Bank Holidays in India 2024: सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. ऑगस्टमध्ये रक्षाबंधननंतर आता श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरे होतील, यानिमित्ताने विविध राज्यांत बँका बंद असतील. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानेही महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील, याशिवाय इतर काही राज्यांमध्येही सप्टेंबर महिन्यातील सणसमारंभानिमित्त बँका बंद असणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर लवकर पूर्ण करून घ्या. त्याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेली सुट्ट्यांची यादी जरूर पाहा.
सप्टेंबर महिन्यातील महाराष्ट्रातील बँक सुट्ट्यांची यादी (List of Bank Holidays of Maharashtra in 2024)
१ सप्टेंबर २०२४ – रविवार – (साप्ताहिक सुट्टी)
७ सप्टेंबर २०२४- गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद राहतील.
८ सप्टेंबर २०२४ – रविवार – (साप्ताहिक सुट्टी)
१४ सप्टेंबर २०२४ – दुसरा शनिवार
१५ सप्टेंबर २०२४ – ओनमनिमित्तदेखील अनेक राज्यांत बँका बंद असणार आहेत. (रविवार)
१६ सप्टेंबर २०२४ – ईद-ए-मिलादनिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
२२ सप्टेंबर २०२४ – रविवार – (साप्ताहिक सुट्टी)
२८ सप्टेंबर २०२४ – चौथा शनिवार
२९ सप्टेंबर २०२४ – रविवार – (साप्ताहिक सुट्टी)
बँका बंद असताना तुमचे काम कसे पूर्ण करायचे?
तारीख | दिवस | निमित्त |
१ सप्टेंबर २०२ | रविवार | साप्ताहिक सुट्टी |
७ सप्टेंबर २०२४ | शनिवार | गणेश चतुर्थी |
८ सप्टेंबर २०२४ | रविवार | साप्ताहिक सुट्टी |
१४ सप्टेंबर २०२४ | शनिवार | दुसरा शनिवार |
१५ सप्टेंबर २०२४ | रविवार | ओनम |
१६ सप्टेंबर २०२४ | शुक्रवार | ईद-ए-मिलाद |
२२ सप्टेंबर २०२४ | रविवार | साप्ताहिक सुट्टी |
२८ सप्टेंबर २०२४ | शनिवार | चौथा शनिवार |
२९ सप्टेंबर २०२४ | रविवार | साप्ताहिक सुट्टी |
सप्टेंबर महिन्यात अनेक सण असतात. अशा स्थितीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण आठ दिवस बँका बंद असतील. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही ही सुट्टी असेल. यासह काही राज्यांमध्ये विविध सणांनिमित्त देखील बँका बंद असू शकतात.
Read More Bank Holiday News : Long Weekends 2024: जानेवारी ते डिसेंबरपर्यंत एक नाही तर तब्बल १३ वेळा सलग सुट्ट्या; आजपासूनच करा ट्रीपचा प्लॅन
बँका बंद असताना तुमचे काम कसे पूर्ण करायचे?
बँकांना असलेल्या सुट्ट्यांच्या काळात अनेक वेळा महत्त्वाची कामे रखडतात. अशावेळी ऑनलाइन बँकिंग सेवांमुळे अनेक कामे सुलभ झाली आहेत. तुम्ही घरबसल्या नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. अशावेळी पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.