वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी लॅपटॉप साथीदार बनला आहे. कारण लोकांना घर बसल्या आरामात कार्यालयीन कामे पूर्ण करता येतात. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे आयुष्य आता लॅपटॉपशिवाय अपूर्ण आहे. पण लॅपटॉपवर काम करताना एक चूक अनेकजण करतात आणि हीच चूक भारी पडू शकते. बरेच लोक लॅपटॉपवर काम करताना तो शट डाऊन न करता डायरेक्ट स्विच ऑफ करुन ठेवतात, पण असे अजिबात करू नये,
जेव्हा तुम्ही लॅपटॉप बंद करता तेव्हा ते शट डाऊन करुनचं बंद करा. किंवा दुसरे काही काम करायचे असल्यास स्लीप मोडमध्ये ठेवा. जर तुम्ही शटडाउन न करता लॅपटॉप बंद केला तर तुमच्यासाठी मोठी समस्या होऊ शकते. यामुळे तुमच्या लॅपटॉपमध्ये स्फोटही होऊ शकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपला लॅपटॉप शटडाऊन न करता बंद केला. यासोबतच घटनेच्या वेळी लॅपटॉप चार्जिंगला लावला होता. त्यानंतर असेकाही घडले जे पाहून धक्काच बसेल.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टेबलावर चार्जिंगला लावलेल्या एका बंद लॅपटॉपमधून धूर निघत आहे. यावेळी तिथे एक व्यक्ती येतो आणि तो नेटची वायर बाजूला करून लॅपटॉपला नेमक काय झाले हे चेक करण्यासाठी हात लावतो. यावेळी त्याच्याबरोबर त्याचा मित्रही असतो. यावेळी तो लॅपटॉप उघडून काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करतो. पण लॅपटॉपमधून आणखी धूर बाहेर येऊ लागतो. यावेळी काही सेकंदातच आवाज बोत लॅपटॉपचा मोठा स्फोट होतो. यानंतर तो व्यक्ती लॅपटॉप उचलून बाहेर फेकतो.
स्फोटाचे कारण व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शेअर केले आहे. अनेकदा लोक लॅपटॉप खरेदी करताना बॅटरीकडे लक्ष देत नाहीत, असे सांगण्यात आले. जेव्हा लिथियम बॅटरी ओव्हरलोड होते, तेव्हा त्यातून द्रव बाहेर पडू लागतो. या काळात विजेचा शॉक लागल्यास बॅटरीचा स्फोट होतो. यामुळे नेहमी चांगल्या दर्जाच्या लॅपटॉपच्या बॅटरी आणि चार्जर वापरण्याचा सल्ला दिला जातो. हा धक्कादायक व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी लॅपटॉपला धोकादायक म्हटले आहे. अनेकांनी स्वस्त लॅपटॉप चार्जर न वापरण्याचा सल्ला दिला आहे.