Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला येणारा संघर्ष काही नवा नाही. याच संघर्षाला धाडसानं सामोरं जाताना आपल्यातील समजूतदारपणा दाखवणारा चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पाहाच..

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एवढ्याश्या जीवात एवढा मोठा समजूतदारपणा येतो तरी कुठून..या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही चिमुकली रणरणत्या उन्हात तिच्या वडिलांसोबत कापूस वेचत आहे. यावेळी वडिल तिला विचारतात, तुला दिवाळीला नवा ड्रेस घ्यायचा का? त्यावर ती म्हणते नाही आपल्याकडं पैसे नाही ना..यावर तिचे वडिला पुन्हा विचारतात नको का तुला ड्रेस? तेव्हा ती म्हणते आपण शिकल्यावर घेऊ..ज्या वयात मुलं स्वत:च्या हातानं खातही नाहीत. त्या वयात ही चिमुकली वडिलांना रानात मदत करत आहे.

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल

जबाबदारी वय पाहू येत नाही

वय नाही पण परिस्थिती आणि जबाबदारी तुम्हाला मोठं बनवते हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल..

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गरीबाची मोठी श्रीमंती; रणरणत्या उन्हात बसून आजीनं दिलं माणुसकीचं दर्शन; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच. मात्र काही मुलांवर खेळण्या-बागडण्याच्या वयात जबाबदाऱ्या येऊन पडतात. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. असाच या चिमुलीयाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लेक असावी तर अशी

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. चिमुकल्याचा समजुतदारपणा नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. लेक असावी तर अशी असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकलीच्या जिद्दीला दाद दिली आहे.

Story img Loader