Viral video: स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे. पण मायेनं डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नसेल तर कशालाही किंमत नाही. आईची किंमत ही आई गेल्यावरच कळते असं नेहमी आपण एकत आलोय. अशाच एका आईविणा जगणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वय नाही पण परिस्थिती आणि जबाबदारी तुम्हाला मोठं बनवते हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईशिवाय जगणं काय असतं हे त्यालाच माहिती ज्याला आई नाहीये. ज्याला खेळण्या-बागडण्याच्या वयातच जबाबदारी आणि कष्टानी पकडून ठेवलंय. अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच. मात्र काही मुलांवर खेळण्या-बागडण्याच्या वयात जबाबदाऱ्या येऊन पडतात. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिमुकला चुलीशेजारी बसून भाकरी करत आहे. भाकरी शेकवण्यासाठी तो तव्यावर भाकरी टाकतो. मात्र तेव्हाच त्याचा हात भाजतो. यावेळी त्याला प्रचंड वेदना होतात. तो डोळ्यावर होत ठेवून रडतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे. या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून त्याच्या वेदना किती मोठ्या आहेत, याचा तुम्हाला अंदाज येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Delhi Pollution: दिल्लीत हवेची गुणवत्ता सर्वात धोकादायक, दोन दिवस शाळाही राहणार बंद; पाहा VIDEO

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @official_marathi_status या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little boy burn hand while making roti video viral on social media users get emotional after watch video srk