आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. ज्यापैकी काही प्राणी असेही असतात ज्यांना आपण पाळीव म्हणू शकतो आणि त्यांना घरी देखील ठेवू शकतो. पण दुसरीकडे असेही काही प्राणी आहेत जे खूप भयानक असतात आणि कधीही हल्ला करू शकतात. अशा प्राण्यांपासून कायमच दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही लोकं या प्राण्यांसोबत छेडछाड करताना दिसून येतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक चिमुरडा चक्क एका मगरीला पाठीवर घेऊन फिरत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, चक्क एका लहान मुलाने मगरीला पाठीवर उचललं आहे. मगरीला पाठीवर लटकवून हा लहान बिनधास्त चालताना दिसत आहे. या मुलाचे धाडस पाहून नेटकरी देखील थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”

@FunnyVideosID या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये चिमुरड्याचे धाडस पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या मुलाने शर्ट घातलेला नाही आणि तो पाठीवर त्याच्याच उंचीची मगर घेऊन फिरत आहे. त्याने त्याने या मगरीचे पुढचे दोन्ही पाय आपल्या हातांनी पकडले आहेत.

( हे ही वाचा: भारतातील ‘हे’ ३ रेल्वे मार्ग थेट परदेशात जातात; पहिल्या रेल्वेमार्गाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल)

येथे पाहा भयानक व्हिडिओ

खरं तर, मगरीला हात लावायलाही लोक घाबरतात आणि या चिमुरड्याने तर चक्क तिला पाठीवर घेतलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच अनेकजण यावर वेगवेगळ्या कंमेंट करताना दिसत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास अनेक जणांनी पहिला आहे.

Story img Loader