शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग. शाळेच्या आठवणी आजही मनाच्या कोपर्‍यात जिवंत असतात. शाळा, शाळेचे दिवस, वर्गखोली, वर्गशिक्षक, शाळेचे मित्र आणि शाळेतील मजेशीर किस्से आपण कधीही विसरू शकत नाही. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आपल्याला शाळेचे दिवस आठवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आपल्याला शाळेचे दिवस आठवतात. या व्हिडीओमध्ये कधी डान्सचे, तर कधी लहानग्यांच्या अभिनयाचे, तर कधी कधी तक्रारींचे व्हिडीओ असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा शिक्षिकेसमोर रडत रडत काही सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

चिमुकल्याने रडतरडत सांगितली व्यथा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला शाळेत रडत रडत शिक्षिकेला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला मुलगा म्हणतो, “मग बापालाच फोन करा माझ्या.” त्यावर शिक्षिका म्हणते, “केलाय विद्या मॅडमने फोन” यावर पुन्हा एकदा शिक्षिकेला विनवणी करत चिमुकला म्हणतो, “अवं ऐका तर माझं, मला मारू नका. ऐका तर माझं, माझा बाप एवढा छळतोय” असं म्हणत चिमुकला ढसाढसा रडतो. त्यावर शिक्षिका त्याला म्हणते, “सरळ बोल की माझ्यासंग.” त्यानंतर व्हिडीओ संपतो म्हणून नेमकं मुलाला काय बोलायचं असतं हे कळत नाही.

इन्स्टाग्रामवरील हा व्हायरल व्हिडीओ @ghogavkarvijay7 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल तीन दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “डिप्रेशनची सुरुवात झाली.” दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलं, “हा व्हिडीओ पाहून लहानपणाची आठवण झाली. आम्हीसुद्धा लहानपणी जर अभ्यास नाही केला, तर असंच करायचो.” तर, एकानं “हे मजेशीर नाही, असं वाटतंय की, या मुलाचा छळ होतोय” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “तो काय सांगतोय ते आधी ऐकून घ्या… ही पद्धत नाही मुलांशी वागण्याची.” तर, अनेकांनी तर्कवितर्क लावलाय की, त्यानं गृहपाठ केला नसावा म्हणून अशी कारणं देतोय. तर काहींना वाटतंय की, त्याला त्याच्या वडिलांकडून खूप छळ होतोय ते सांगण्याचा तो प्रयत्न करतोय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little boy crying in school telling teacher about fathers abuse and asking not to beat video viral on social media dvr