Kid driving Tempo: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. लहान मुलांना नवनवीन गोष्टी शिकण्याची खूप उत्सुकता असते आणि ती गोष्ट एकदा जमली की, ते अनेकदा त्याच्या आहारी जातात. पण, काही गोष्टी शिकण्याचा आणि शिकवण्याचा एक वेळ वा काळ असतो आणि हे प्रामुख्यानं त्यांच्या पालकांना कळलं पाहिजे. आवड म्हणून पालक आपल्या मुलांना हवं ते करण्याची परवानगी देतात आणि त्यासाठई त्यांना पाठबळही देतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा टेम्पो चालवताना दिसतोय. एवढ्या लहान वयात टेम्पो चालवणं त्याच्या जीवावरही बेतू शकतं. परंतु, पालकांचा निष्काळजीपणा अनेकदा मुलांच्या अशा बेफिकीर वागण्याला कारणीभूत ठरतो.

sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
woman mimics cartoon character Shinchan
‘तुम्ही माझ्या आईला विचारू…’ वाहतूक पोलिसांनी पकडताच शिनचॅनची करू लागली नक्कल अन्… ; पाहा तरुणीचा Viral Video
Couple dance video husband wife dance in wedding on marathi song
VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
Sprouted coconuts What they are and if its advisable to have them
अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
husband wife conversation before marriage joke
हास्यतरंग : लग्नाच्या आधी…
zee marathi lakshmi niwas serial 3 idiots fame actor
3 Idiots फेम अभिनेता ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत साकारतोय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच

हेही वाचा… कष्ट केल्याशिवाय पोट भरत नाही! दोन्ही पाय गमावले पण…, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच

मुलगा चालवतोय टेम्पो

लहान मुलाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओमध्ये मुलगा पिकअप टेम्पो चालवताना दिसतोय. चालकाच्या आसनावर बसलेल्या मुलाने मागे पाण्याचा रिकामी जार ठेवला आहे; जेणेकरून त्याला गाडी नीट चालवता येईल. परंतु, आवड असली तरी या वयात लहान मुलांना गाडी हाताळायला देणंच चुकीचं आहे. त्याच दृष्टिकोनातून सरकारी प्रशासनाने नियम करून, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणीही गाडी चालवणं हा एक गुन्हाच ठरवला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @babya6132 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘नाद’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल १.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… “…आणि तुम्हाला वाटत तुमचं आयुष्य अवघड आहे”, दिव्यांग तरुणाची पोटासाठी चाललेली धडपड पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा VIDEO

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “खूप छान गाडी चालवतोय तुमचा बाळ; पण दादा त्याचं हे वय नाही. आता त्याला शिक्षणाची गरज आहे. योग्य वेळ आल्यावर आणि वय झाल्यावरच त्याच्या हातात गाडी द्या.” तर दुसऱ्यानं “नादच आहे हा. या वयात काय भारी गाडी चालवतोय,” अशी कमेंट केली.

एक जण कमेंट करत म्हणाला, “ही सगळी फालतूगिरी आहे. ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी कराव्यात. हाच व्हिडीओ आरटीओच्या हाती लागला, तर तुमच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते.” तर एकानं, “आई-वडिलांना लाज वाटली पाहिजे. आपण काय शिकवतोय मुलांना”, अशीदेखील कमेंट केली.

Story img Loader