ब्रिटीशकालीन मुंबईत सार्वजानिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिया साधन म्हणून ट्राम ओळखली जायची. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने ट्रामच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. सोबतच या व्हिडीओमधल्या लहान मुलाने आपल्या गोड एक्सप्रेशन्सने लाखो लोकांना आपल्या प्रेमात पाडलंय.
सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडीओ शेअर होत असतात. अनेकदा लहान मुलांचे क्यूट व्हिडीओंचा जणू खजिनाच असतो. असे व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल होत असतात. लहान मुलांचे हे क्यूट एक्सप्रेशन्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरत नसेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओमधल्या चिमुकल्याचे एक्सप्रेशन्स पाहून क्यूट हा एकच शब्द तुमच्या तोंडून निघेल.
आणखी वाचा : बुडत्या टायटॅनिक सारखं दिसणारं बाऊन्सी हाऊस पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO पाहाच
या व्हायरल व्हिडीओमधला चिमुकला पहिल्यांदा ट्राममध्ये बसला होता. त्यावेली ट्रामचा प्रवास अनुभवताना त्याने चेहऱ्याचे जे एक्सप्रेशन्स दिलेत ते पाहून लोक त्याच्या प्रेमात पडू लागले आहेत. तो उत्साही दिसत होता आणि व्हायरल झालेला व्हिडीओ त्याचा पुरावा देत आहे. लहान मुलांची आई मिशेल बाओ यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्याला ९ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये, लहान मुलगा त्याच्या पहिल्या ट्राम राईडसाठी त्याच्या वडिलांच्या शेजारी बसलेला दिसत आहे. इकडे तिकडे पाहिल्यानंतर अचानक तो दिलखेचक स्माईल करताना दिसतो. ही छोटी क्लिप त्याच्या आईने रेकॉर्ड केलेली दिसते. त्याचा हा आनंद थेट गगनाला जाऊन भिडलेला दिसत आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही ही हेच म्हणाल.
आणखी वाचा : या सुंदर कॅलिग्राफीपुढे प्रिटींग मशीनची छपाई सुद्धा फेल, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सिंहाच्या छाव्याला ओंजारत गोंजारत होता, मग काय पुढे जे केलं त्यामुळे जन्माची अद्दल घडली!
या व्हायरल व्हिडीओमधल्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येतोय. या लहानग्याचा एक्स्प्रेशन्सचा खेळ पाहून आपल्याही चेहऱ्यावर छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहत नाही. सध्या हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कमेंट सेक्शनमध्ये त्याच्यावर प्रेमाचा वर्षावर करताना दिसून येत आहे. अनेकांनी या चिमुकल्याच्या एक्स्प्रेशन्सचे कौतूक केलंय.