आजकालची लहान मुले जरा जास्तच अॅक्टिव्ह झाली आहेत असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून हल्ली लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे जरा जरी दुर्लक्ष झालं तर ते असं काही करून बसतात जे निस्तरणंदेखील कठीण होतं.
आधी लहान मुलं आई-वडिलांच्या शब्दाबाहेर नसायचे. पण, आजकाल मनाला वाटेल ते आणि हवं ते करण्यासाठी लहान मुलं अगदी हट्टालाच पेटतात. त्यामुळे मुलांच्या लहान-सहान गोष्टींकडे प्राधान्याने नजर ठेवणे ही पालकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण, काही मुलं आई-वडिलांचं लक्ष नसताना स्वत:च्या मनासारखं करतात आणि उपद्व्याप करून ठेवतात.
हेही वाचा… आजोबा जरा दमानं! धावत्या ट्रेनच्या दरवाजात आजोबांचा धोकादायक स्टंट, VIDEO पाहून उडेल झोप
सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा खेळायच्या नादात चक्क शिडीवरून खाली कोसळला आणि शिडीवरून खाली वाकून बघणे त्याला खूपच महागात पडले.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना खूप मोठा धक्का बसला आहे. या व्हिडीओत एका चिमुकल्याचा खेळता खेळता अपघात होतो आणि त्याला दुखापतदेखील होते. व्हिडीओच्या सुरुवातीलाच आपण पाहू शकतो की, खेळत खेळत एक चिमुकला पायऱ्यांवरून खाली उतरत असतो. पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या दांडीवरून तो खाली वाकून कोणालातरी बघत असतो. खाली वाकून बघताना अधिक जोर दिल्याने चिमुकल्याचा तिथल्या तिथे तोल जातो आणि खालच्या पायरीच्या दांडीला आपटत खाली पडतो. एवढ्या अंतरावरून खाली पडल्याने चिमुकल्याला बरचं लागलं असतं, त्यामुळे तो रडू लागतो.
हेही वाचा… एक डुलकी, एक अपघात! मुंबई लोकलमध्ये झोप लागताच माणसाचा गेला तोल अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का
हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, त्याला खरोखर खूप लागलं असेल आणि ते दुखतही असेल. तर “थेट पायरीवर डोके आपटण्यापासून तो वाचला याबद्दल देवाचे आभार”, अशी दुसऱ्याने कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं की, “आशा आहे की त्याने आतातरी धडा शिकला असेल की यापुढे असं काही करू नये.”
दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर लहान मुलांच्या अशा अपघातांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. खेळण्याच्या नादात अनेकांच्या जीवावरदेखील बेतलं आहे, त्यामुळे आपल्या मुलाची वेळोवेळी काळजी घेणं ही पाल्याची जबाबदारी दुपटीने वाढली आहे.