सोशल मीडियावर सध्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे नेटकरी मनापासून कौतुक करत आहेत तर अनेकजण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याचं कारण म्हणजे चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संस्थेने (ISRO) आता सूर्याकडे झेप घेतली आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य-L1’ अंतरयानचे श्रीहरिकोटा येथून काल २ सप्टेंबरला यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लाँचिंगच्या १२७ दिवसांनी यान एल-१ अचूक कक्षेपर्यंत पोहचल्यानंतर ते सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असं ‘इस्रो’नं सांगितलं आहे. आदित्य-L1 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर लोक सोशल मीडियावर इस्रोचे अभिनंदन करत आहेत.

२३ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारताने एक नवीन इतिहास रचला तो म्हणजे या दिवशी भारत चंद्रावर पोहोचला, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी होताच जगभरातील लोकांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव केला. चांद्रयान ३ च्या यशाचा संपूर्ण देशाला अभिमान असून सर्व भारतीयांनी सर्व नामवंत शास्त्रज्ञांचे आभार मानले होते. अशातच आता सोशल मीडियावर इस्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांचा आणि एका लहान मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या लहान मुलाने डॉ. एस सोमनाथ यांना विक्रम लँडरच्या मॉडेलची छोटी प्रतिकृती भेट दिली आहे.

girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
in Parbhani Dr Babasaheb Ambedkar Statue and Constitution Sculpture are vandalized
आंबेडकरांचे नाव घेण्याची अपरिहार्यता
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले

हेही पाहा- ”जय हनुमान ज्ञान गुण सागर”, बोबड्या बोलीत चिमुकलीने गायलेली हनुमान चालिसा एकदा पाहाच…

या मुलाने चांद्रयान-३ मोहिमेदरम्यान चंद्रावर नेण्यात आलेल्या विक्रम लँडरची प्रतिकृती तयार केली आहे. जी त्याने इस्रो प्रमुखांना भेट म्हणून दिल्याचा हृदयस्पर्शी फोटो सद्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय या फोटोवर नेटकरी चांगल्या आणि हृदयस्पर्शी प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “मुलगा प्रतिभावान आहे. आमच्या लहानपणी आम्ही फक्त पतंग आणि विमाने बनवायचो आणि उडवायचो.” तर आणखी एकाने हे दृश्य खूप सुंदर असल्याचं लिहिलं आहे.

दरम्यान, नुकतेच एका एयर होस्टेसने इस्रो प्रमुखांचे विमानात स्वागत केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती सोमनाथ यांचे स्वागत करताना म्हणते, “आज इस्रोचे प्रमुख श्री. डॉ. एस सोमनाथ, हे आपल्याबरोबर विमानात आहेत हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. ते आज आमच्या फ्लाइटमध्ये आहेत. सर तुम्ही विमानात आल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.” विमानात महिलेने एस. सोमनाथ आहेत हे सांगताच प्रवासी आनंदाने टाळ्या वाजवतात.

Story img Loader