Viral video : लहान मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडंसंही दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चे कंपनी खेळता खेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मूल असल्यास ही बातमी आवर्जून वाचणं गरजेचं आहे. कारण- हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या समोर आली आहे. यावेळी गार्डनमध्ये खेळता खेळता एक चिमुकला जखमी झाला आहे. जोरदार झोका घेणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लहान मुलांना बाहेर घेऊन गेल्यावर त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका झोक्यावर तीन लहान मुलं झोका घेत आहेत. तर, या तिघांना चौथा मुलगा झोका देत आहे. तो समोरून यांना झोका देत आहे, यावेळी दोघे जण झोक्यावर उभे आहेत; तर एक जण बसलेला दिसत आहे. झोक्याचा सुरुवातीला कमी असलेला वेग नंतर हळूहळू वाढत जातो आणि झोका खूप उंच जाऊ लागतो. यावेळी उभा असलेला एक मुलगा हवेत फेकला जाऊन झोक्यालाच जोरदार धडकतो आणि उलटा खाली पडतो. त्यानंतर तो तसाच जमिनीवर पडून असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. कारण- आजूबाजूला मोठं कुणीच दिसत नाहीये, तसेच जी मुलं तिथे आहेत तीसुद्धा लहान आहेत. त्यामुळे पालकांची ही चूक चिमुकल्याच्या जीवावर बेतली. पुढे या मुलाचं काय झालं याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @FAFO_TV नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत ३२.२ मिलियन इतके व्ह्युज गेले असून लाइक्सही लाखोंमध्ये आहेत. तर नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं म्हटलंय, “हे भयानक आहे. मुलांना असं एकटं सोडायला नको.” दुसरा म्हणतो, “बापरे! यांचे पालक कुठे आहेत? पुढे त्या मुलाचं काय झालं?” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करीत आहेत.