गेल्या काही दिवसांपासून चिमुकल्या मुलांच्या व्हायरल व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आताहा एक लहान मुलाच्या डान्सचा जबरदस्त व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटिंच्या गाण्यावर भन्नाट डान्स करायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘कावला’ गाण्याची लोकांना भूरळ पडलीय. हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून आजपर्यंत लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गाणं इतकं गाजलय की एका चिमुकल्याने चक्क लुंगी डान्स करत ‘कावला’ गाण्याची शानच वाढवलीय.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटातील हे गाणं असून लोकांना चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे. ‘कालवा’ गाण्यावर तमन्ना भाटियाने जबरदस्त नृत्य केलं असून दिवसेंदिवस हे गाणं लोकप्रिय होताना दिसत आहे. पण या लहान मुलानं कालवा गाण्यावर केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे. @ji_th_in_k_da_s_या यूजरने मुलाच्या लुंगी डान्सचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
नक्की वाचा – शाळकरी मुलीनं पकडला सर्वात खतरनाक साप, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल
इथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या लहान मुलानं दाक्षिणात्य कपडे परिधान करून कालवा गाण्यावर डान्स केलाय. या मुलाचे ठुमके पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख १७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच व्हिडीओ प्रचंड गाजल्याने नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव करत चिमुकल्याचं कौतुकही केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, वाह! वाह! चिमुकल्याने काय जबरदस्त डान्स केलाय.