Little Boy helping Mother: आई तिच्या मुलांवर अगदी लहानपणापासून संस्कार करते. त्यांचे हट्ट तर पुरवते पण चांगलं काय वाईट काय यातला फरकही आईच शिकवते. मुले-मुली अगदी समान आहेत आणि प्रत्येकालाच गरजेच्या गोष्टी आल्या पाहिजेत, याची जाणीव घरच्या संस्कारातूनच होते. अगदी लहान सहान गोष्टी शिकण्यात कोणताच कमीपणा न बाळगता खरंतर ही काळाचीच गरज आहे हे ज्याला समजतं तेच मुल आयुष्यात पुढे जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरातलं जेवणं, धुणी भांडी, कचरा या गोष्टी जशा घरच्या गृहिणीला येतात मुलीला येतात तशाच त्या मुलालाही आल्या पाहिजेत असा सुंदर संदेश देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक लहान मुलगा भाकरी थापत आपल्या आईची मदत करताना दिसतोय.

हेही वाचा… वरातीत प्रियकराची दादागिरी! नवरदेवाच्या गाडीवर केली दगडफेक, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…

शेवटी आईचे संस्कार

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा जेवणात आपल्या आईला मदत करताना दिसतोय. कोणतं लहान काम नाही तर हा मुलगा चक्क भाकरी थापताना दिसतोय. एका परातीमध्ये पीठ घेऊन ते चांगलं मळून हा चिमुकला भाकरी अगदी चांगल्या रितीने थापताना दिसतोय. बाजूला आजी परात पकडून त्याचे परिश्रम पाहतेय, व त्याची मदत करतेय.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/priti_tuzi_mazi_10/reel/DEMDInZyDOv/

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @priti_tuzi_mazi_10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “प्रत्येक मुलाला पुस्तकी ज्ञान असणे आवश्यक आहे, तसे घरातील सर्व गोष्टी शिकणे हीसुद्धा आता काळाची गरज आहे ” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… तुम्हीच सांगा चूक कोणाची? एका हातात स्टेअरिंग अन्…; लहान मुलगा चालवतोय टेम्पो, पाहा थक्क करणारा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “किती भाग्यवान असेल तुमची सून”. तर दुसऱ्याने “किती छान भाकरी थापतोय, अगदी माझ्यापेक्षाही छान” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “खूप सुंदर छान शिकवण.” “धन्य ती माऊली” अशीदेखील कमेंट एकाने केली.

“मुलाला फक्त आईच घडवू शकते”, “खूप छान संस्कार, हे सगळं मुलांना यायलाच पाहिजे” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little boy making bhakri mothers discipline viral video on social media dvr