अनेकांना प्राणी आणि पक्षी यांचे संगोपन करायला प्रचंड आवडते. बहुतेक लोकांना कुत्री किंवा मांजर पाळणे आवडते, बरेच लोक त्यांचे आपल्या मुलांप्रमाणे पालनपोषण करतात, परंतु असे बरेच लोक आहेत जे जंगली आणि भयानक प्राणी यांना देखील पाळताना दिसतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ रोज पाहायला मिळतात, ज्यामध्ये काही लोक साप आणि अजगर पाळताना दिसत आहेत, तर काही जण जंगलाचा राजा सिंह याला देखील पाळताना दिसत आहेत. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा घरामध्ये सिंहिणीशी खेळताना दिसत आहे. यादरम्यान, सिंहींण खेळता खेळता अचानक मुलाचा हात जबड्यात धरते.
तुम्ही आजवर जंगलात किंवा पिंजऱ्यात सिंहाला फिरताना पाहिलं असेल, पण मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन सिंहिणी घराच्या आत एका लहान मुलासोबत खेळताना दिसत आहेत. खेळता खेळता हा लहान मुलगा सिंहीणीच्या जबड्यात हात घालतो पण सिंहींण त्याला काहीही करत नाही. व्हिडिओमध्ये सिंहिणीसोबत खेळणाऱ्या लहान मुलाला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. खरं तर सिंहाचा नुसता उल्लेख केला तरी लोकांच्या पोटात धडकी भरते. अशा परिस्थितीत हा मुलगा बिनधास्तपणे सिंहीणीसोबत मस्ती करताना पाहून भल्याभल्यांना घाम फुटला आहे.
( हे ही वाचा: Video: आगीबरोबर स्टंट करायच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग; ‘तो’ पायजमा काढून पळत सुटला अन..)
येथे व्हिडिओ पहा
( हे ही वाचा: Video: भर लग्नमंडपात घुसला संतापलेला बैल; अडवायला गेलेल्या माणसावर हल्ला करत त्याला फेकून दिले अन..)
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @gir_lions_lover नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा दोन सिंहांशी प्रेम करताना आणि खेळताना दिसत आहे, जे पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे अडीच लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला ६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेटवरील यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.