पाऊस….ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो कारण शेतातील पिक त्या पावसावर अवलंबून असतो. शेतकऱ्याशिवाय पावसाचे आनंदाने स्वागत करणारे फार मोजके लोक असतात. चित्रपटांमध्ये पावसात भिजणारे हिरो-हिरोईन अनेकदा पाहिले असले. पण खऱ्या आयुष्यात एकदातरी असं पावसात भिजावे अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते.पण काही ना कारण देऊन अनेकजण ते टाळतात. पण फार मोजके लोक असतात जे कसलाही विचार न करत बिनधास्तपणे पावसामध्ये भिजतात. रस्त्यावरील खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात आनंदाने उड्या मारतात. अशाच एका पावसात खेळणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्याबरोबर रस्त्यावर दोन भटके कुत्रे देखील पावसात भिजण्याचा आनंद घेत आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाने मुंबईला झोडपून काढले. मुंबईचा पाऊस म्हणजे एक वेगळं गणित आहे जे सोडवण्याचा प्रयत्न अजूनही करत आहे. धो धो पाऊस कोसळ्यानंतर उफाळलेला समुद्र पाहण्याचा आनंद घ्यावा की रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत घरी जावे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेक मुंबईकर अडकलेले दिसतात. पण काही मोजके मुंबईकर असे आहेत जे दोन्हीचा आनंद घेताना दिसतात. सध्या अशाच मुंबईतील पावसामध्ये भिजणाऱ्याचा चिमुकला आणि भटक्या कुत्र्यांचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत की, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातमध्ये एक चिमुकला बिनधास्तपणे खेळत आहे. त्याच्याबरोबर दोन भटके कुत्रे देखील पावसाच्या पाण्यात उड्या माारताना दिसत आहे. चिमुकला कुत्र्यांच्या अंगावर पाणी उडवत आहे.या व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल.
इंस्टाग्रामार रिद्धी सुरती नावाच्या अकाउंटवरून या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे: “मुंबई आणि पाऊस, एक अतुलनीय प्रेमप्रकरण” असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ २ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
व्हिडीओच्या कमेंट विभागावर एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की ही छोटी क्लिप अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना आनंदित करण्यात यशस्वी ठरली आहे कारण हा खूप सुंदर क्षण आहे.
“हा व्हिडिओ खूप आनंदाने भरलेला आहे. पाऊस, लहान मुलगा खेळत आहेत, कुत्रा त्याच्या आजूबाजूला उड्या मारत आहेत, तुम्ही हसत आहात आणि RHTDM चे एक सुंदर निवडलेले गाणे. हृदयस्पर्शी व्हिडिओ. व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद आणि मला ते सुंदर क्षण जगू द्या,” एकाने कमेंटमध्ये लिहिले
दुसरा म्हणतो, “व्हिडीओ किती गोंडस आहे.”