सोशल मीडियावर लहान मुलांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आणि डान्सच्या व्हिडीओजना नेटिझन्स मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. काही व्हिडीओ तर इतके मजेदार असतात की ते कितीही वेळा पाहिले तरी कमीच असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा बॉलिवूड फिल्म ‘गली बॉय’ मधलं सुपरहिट रॅप ‘आपमा टाइम आएगा’ गाताना दिसून येतोय. एका वेगळ्या अंदाजातलं हे रॅप लोकांना खूपच आवडलं आहे. तसंच सोशल मीडियावर या चिमुकल्या रॅपरचं भरभरून कौतुक करण्यात येतंय.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडीओ अरूणाचल प्रदेशमधला आहे. इथे राहणाऱ्या एका लहान मुलाने आपल्या जबरदस्त अंदाजात ‘गली बॉय’ चित्रपटातलं हे रॅप सॉंग गायलंय. हे रॅप गाताना त्याने त्याच्या चेहऱ्यावर ज्या पद्धतीने एक्स्प्रेशन्स दिले आहेत, ते पाहून सोशल मीडियावरील प्रत्येक जण त्याचे फॅन झाले आहेत. या व्हिडीओमध्ये मागे त्याचे काही मित्र त्याला प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत.
हा व्हिडीओ ट्विटरवर ‘Yuva Arunachal’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, “या जगात टॅलेंटची कोणती कमी नाही आणि याला कोणती मर्यादा देखील नाही…जगात कोणत्याही कानाकोपऱ्यात टॅलेंट भरभरून पहायला मिळेल.” एका रात्रीत सोशल मीडियावरचा सेलिब्रिटी बनलेला हा मुलगा अरूणाचल प्रदेशमधल्या मोपना मूल वंशाचा असून छोट्याश्या गावात राहणारा आहे.
‘Yuva Arunachal’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ एक दिवसापूर्वीच म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करून अवघे २४ तास सुद्धा उलटले नाहीत तर या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या चिमुकल्याचा बिनधास्त अंदाज आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स पाहून प्रत्येक जण त्याच्या आवाजात रमताना दिसून येतोय. या व्हिडीओवर कमेंट्स करन नेटिझन्स त्याचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.