Little Boy Recite Sing Shiva Tandava Stotram: आपल्या सर्वांनाच माहित आहे की श्रावण महिना आहे जो भगवान शंकर यांना अधिक प्रिय आहे. भारतातील काही राज्यामध्ये सध्या उत्साहात श्रावण महिना साजरा केला जात आहे. सर्वत्र भोलेनाथाचा जयजयकार करत भक्त भजन- किर्तन गात आहे. त्याचबरोबर कावड यात्रेकरू रस्त्यावरून जाताना दिसत आहे. कित्येक भक्त महादेवाची स्तुती करताना दिसत मंदिरांमध्ये दिसतात. या काळात कित्येक भक्त शिव तांडव स्तोत्र आवर्जून पाठ करतात कारण ते भगवान शंकर यांना अतिशय प्रिय आहे असे मानले जाते. शिव तांडव स्तोत्राचे उच्चार करणे वाटते तेवढे सोपे नाही. दरम्यान एका चिमुकल्याचा शिवतांडव स्तोत्र गातानाचा गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून लोक या मुलांचे कौतूक करत आहेत.
लहान मुलाने पठण केले शिव तांडव स्तोत्र
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिव तांडव स्तोत्राचे पठण करणाऱ्या एका लहान मुलाचा आत्मविश्वास खरोखरच पाहण्यासारखा आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मूल एका दमात मोठ्या आत्मविश्वासाने शिव तांडव स्तोत्राचे पठण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्याला खूप पसंती दिली जात आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक लहान मूल शेतात उभे असल्याचे दिसत आहे, ते पाहून त्याचे वय ५ते ६ वर्षे असावे असा अंदाज बांधला जाऊ शकतो. व्हिडीओमध्ये बनियान आणि शॉर्ट्समध्ये दिसणाऱ्या मुलाचे नाव शिवांश असल्याचे समजते. इंस्टाग्रामवर शिवांश प्रजापती नावानच्या अंकाऊवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती एका मुलाला शिव तांडव स्तोत्र पाठ करण्यास सांगतो, हा मुलगा लगेच तयार होते आणि पूर्ण आत्मविश्वासाने, आपल्या गोंडस आवाजात तो शिव तांडव स्तोत्राचे पठण करण्यास सुरुवात करतो. शिव तांडव स्तोत्र म्हणताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव नक्कीच पाहण्यासारखे आहेत.
हेही वाचा – अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या नादात जोडप्याने फिरण्यासाठी केली UBER कॅब अन् बिल आलं तब्बल २४ लाख रुपये!
चिमुकल्याचा आत्मविश्वास पाहून थक्क झाले लोक
१ दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 7 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘साहेब, तो खेड्यातील मुलगा आहे, संस्कृती आणि संस्कार दोन्ही जाणतो.’ दुसर्या यूजरने लिहिले की, ‘हे मूल सामान्य नाही, तो त्याच्या मागच्या जन्मी नक्कीच कोणी विद्वान असावा. हर हर महादेव