लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या काळाजाला हात घालतात. सध्या अशाच एका चिमुकल्याने लावणी सादर केली आहे जी नेटकऱ्यांनी प्रचंड आवडली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका चिमुकल्याने लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘कारभारी दमानं’ या गाण्यावर लावणी केली आहे. शाळेच्या गणवेशामध्ये असलेल्या या चिमुकल्याने ठसकेबाज लावणी सादर करून सर्वांचे मन जिंकले आहे. चिमुकला अत्यंत निरागसपणे नाचताना दिसत आहे. ढोलकीच्या तालावर तो गोंडसपणे ठुमकत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव इतके मोहक आहे की पाहताक्षणी सर्वजण त्याचे चाहते होत आहेत. गाण्याच्या तालावर त्याचे पाय अगदी अचूकपणे थिरकत आहे. नेटकऱ्यांना चिमुकल्याची लावणी खूप आवडली आहे. अनेकांनी कमेंट करून चिमुकल्याच्या लावणी नृत्याचे कौतुक केले आहे.

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर bandenavaj_pathan_22 नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कारभारी दमानं भन्नाट नृत्य”

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले,”भाऊसमोर गौतमी पाटील फेल आहे.

दुसऱ्याने कमेंट केले की, “बारक्याने मार्केट जाम केले”

तिसऱ्याने कमेंट केले की, “खूप मोठा कलाकार होईल हा मुलगा, अंगात कला म्हणजे जिवंतपणाचे लक्षणे आहे.”

चौथ्याने कमेंट केली की, “इतक्या लहान मुलाला इतका छान डान्स कसा जमतो”

पाचव्याने कमेंट केली की, “कारटं खतरनाक आहे”

सहाव्याने कमेंट केली की,”एक नंबर भावा”

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मराठी मातीतली लावणी सातासमुद्रापार पोहचवली.‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘कारभारी दमानं’ या त्यांनी सादर केलेल्या लावण्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतल्या आहे.

Story img Loader