Viral video: वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात; ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात; पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करीत नाहीत. मुलं वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असतात. वडिलांप्रति आदरयुक्त भीती पाहायला मिळते. मात्र, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे कित्येक मुलांचंही एक स्वप्न असतं. या मुलानं वडिलांनं असं गिफ्ट दिलंय, की जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वयाचं काय आहे भावना महत्त्वाच्या…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या चिमुकल्याच्या वडिलांचा वाढदिवस आहे. यावेळी त्याला त्याच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे, पण परिस्थितीमुळे काय देणार असा प्रश्न असल्यानं या चिमुकल्यानं छोटासा का होईना पण एक वडिलांसाठी आणला. रात्री वडिल घरी आल्यानंतर हा चिमुकल्या वडिलांसमोर केक घेऊन गेला. यावेळी वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद हा तुम्ही पाहू शकता. या आनंदाची तुलना कोणत्याच गोष्टीशी होणार नाही.
आई म्हणजे घराच्या चार भिंती, पण वडील म्हणजे घराचे छत असते. सण-उत्सवावर, कुटुंबातील सर्व सदस्यांना नवीन कपडे आणल्यानंतर, जो स्वतः सर्वात जुना शर्ट घालतो तो व्यक्ती म्हणजे बाप.आपण आपला नटखटपणा आणि प्रेम आपल्या आईवर व्यक्त करतो, पण ते आपल्या वडिलांसमोर इतके उघडपणे व्यक्त करू शकत नाही. पण प्रत्येक मुलाच्या दृष्टीने वडील हा त्यांचा पहिला ‘सुपर हिरो’ असतो. एक सुपरहिरो जो बॅटमॅन किंवा स्पायडर-मॅनसारखा हवेत उडत नाही, त्याच्याकडे कोणतीही सुपर पॉवर नाही, परंतु तरीही तो आपल्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतो.याच सुपर हिरोसाठी कधीतरी आपणही काहीतरी करावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते हीच इच्छा या चिमुकल्याचीही होती अन् त्यानं पूर्ण केलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “पिंजऱ्यात असला तरी तो सिंहच” पाकिस्तानात तरुण सिंहाला नडला; केली अशी अवस्था की शेवटी देवाला हाक मारू लागला
सोशल मीडियावर हा व्हिडीओ __weddings__vibes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. वडिलांना सरप्राईज दिल्याबद्दल अनेकांनी त्या मुलाचं कौतुक केलं आहे. कारण- वडिलांच्या अश्रूंची किंमत नक्कीच त्या केकपेक्षा जास्त आहे. मीही एक दिवस माझ्या वडिलांना गिफ्ट देईन. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.