Little kid viral video: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. हल्लीची काही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंमध्ये लहान मुलं नवनवीन रील्स बनवताना दिसतात, तर कधी डान्स करताना दिसतात; तर काही व्हिडीओ त्यांच्या नकळत काढण्यात आलेले असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहान मुलं अनेकदा मोठ्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक गोष्टी शिकत असतात. काही गोष्टींची आवड अगदी लहानपणापासूनच त्यांना लागते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ते खरंय. लहानपणीच अनेक मुलांचे कलागुण दिसू लागतात. सध्या अशाच एका लहानग्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा वेट लिफ्टिंग करताना दिसतोय.

हेही वाचा… जावई नंबर १! भरलग्नात नवरदेवाने सासऱ्यांचा आग्रह नाकारला, ‘ती’ गोष्ट घेण्यास दिला नकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

चिमुकल्याचा नादच भारी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला चक्क वेटलिफ्टिंग करताना दिसतोय. आपली सगळी ताकद लाऊन तो अगदी योग्य पद्धतीने वेट लिफ्टिंग करताना दिसतोय. चार ते पाच वर्षांचा असलेला हा लहानगा अगदी न घाबरता हा व्यायामप्रकार करताना दिसतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘हा नाद रक्तात असावा लागतो!’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा…. “बॉयफ्रेंड बेवडा चालेल पण नवरा…”, तरुणानं प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना दिला जबरदस्त टोमणा; पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल

युजर्सच्या प्रतिक्रिया

चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एक नंबर.” तर दुसऱ्याने, “मुलाने कमालच केली”, अशी कमेंट केली.

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकले नाही. तरी या चिमुकल्याचं सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little boy video viral of weight lifting on social media dvr