Viral video: कुंभार जसं मातीच्या गोळ्याला आपल्या हातातील कौशल्याने सुंदरसा आकार देतो व मग त्यापासुन कधी मातीचा घडा बनतो व तो पाणी शितल बनवतो आणि तहानलेल्याची तहान भागवतो तर कधी पणती बनुण प्रकाश देते.तसेच लहान मुलांना शक्य तेवढे चांगले कौटुंबिक वातावरण व उत्तम संस्कार मिळाल्यास तो चांगला व्यक्ती नक्कीच होतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणारे आचार आणि विचार म्हणजेच संस्कार. गरीब असो वा श्रीमंत संस्कार हे विकत घेता येत नाहीत. हे मोठ्यांकडून लहानांकडे येत असतात. लहान मुलं आपल्या आजूबाजूला जे जे घडतं त्याचं निरिक्षण करत असतात आणि त्याचेच अनुकरण करत असतात. कधी कधी ही मुलं आजूबाजूला पाहिलेल्या गोष्टीचे नकळत अनुकरण करताना दिसतात. दरम्यान अशाच दोन चिमुकल्यांच्या एका कृतीनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिकंली आहेत.

गरीब असो वा श्रीमंत संस्कार हे विकत घेता येत नाहीत. हे मोठ्यांकडून लहानांकडे येत असतात. लहान मुलं आपल्या आजूबाजूला जे जे घडतं त्याचं निरिक्षण करत असतात आणि त्याचेच अनुकरण करत असतात. कधी कधी ही मुलं आजूबाजूला पाहिलेल्या गोष्टीचे नकळत अनुकरण करताना दिसतात. दरम्यान अशाच दोन चिमुकल्यांच्या एका कृतीनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिकंली आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला एक गाय बसली आहे आणि गाईच्या बाजुला दोन चिमुकले उभे आहेत. हे दोघंही गाईचं निरिक्षण करत उभे आहेत. यावेळी तिथे एक महिला येते आणि गाईच्या पाया पडते. हे पाहून ती लहान मुलंही गाईच्या पाया पडू लागली. याचाच अर्थ लहान मुलं आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असतात मग ते चांगलं असो की वाईट.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; डुक्करांपासून संरक्षण करण्यासाठी ढासू जुगाड; Video एकदा पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ muddyachbola नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत “शेवटी संस्कार महत्त्वाचे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं “मला नाही वाटत आता इथून पुढच्या पिढीमध्ये असं काही बघायला मिळेल” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little boys took blessings from cow heart touching video goes viral on social media srk