लहान मुलांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. म्हणूनच हे व्हिडिओ इंटरनेटवर येताच प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात. काही वेळा या मुलांच्या गोष्टी मजेशीर असतात, तर कधी मुले असे काहीतरी करतात, जे पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, खरंच आजकालच्या मुलांना काही शिकवण्याची गरज नाही.
लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणे थोडे कठीणच असते. अनेकदा त्यांच्या पालकांना प्रवासात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. मुलं मस्ती करत असतात किंवा काहीतरी विचित्र गोष्टी करत बसतात. ज्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. पण आता समोर आलेला व्हिडिओ जरा वेगळा आहे कारण यामध्ये एक लहान बाळ ट्रेनच्या वरच्या सीटवरून कसलाही आधार न घेता खालच्या सीटवर उतरत आहे. एवढ्या लहान वयात या मुलाने केलेलं धाडस पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
( हे ही वाचा: Video: शॉर्टकट घेणं अंगाशी आलं! रेल्वे ट्रॅक ओलांडत होता माणूस, तितक्यात समोरून ट्रेन आली अन…)
येथे व्हिडिओ पहा
आता मुलांना जास्त वेळ एकाच जागी बसायला आवडत नाही. असेच काहीसे या मुलासोबत घडले.. जिथे हे लहान बाळ ट्रेनच्या वरच्या सीटवर बसला होता आणि त्याला खाली उतरायचे होते, मात्र त्याचे कोणी ऐकत नव्हते. त्यानंतर हे लहान बाळ स्वतःच एका सीटवरून दुसऱ्या सीटवर आणि दुसऱ्या सीटवरून तिसऱ्या सीटवर उतरताना दिसत आहे. खर तर इतक्या लहान वयात असं सीटवरून उतरणे सोपे नाही. मात्र हे मुल अगदी सहज पद्धतीने खाली उतरते.
( हे ही वाचा: Video: कार्यक्रमात बेभान नाचत होती ‘ही’ चिमुकली; डान्स करताना दिलेला ‘तो’ ठुमका पाहून शिक्षकही फिदा)
@anamika943 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १.७४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने सांगितले की, हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की व्वा! हे मूल अप्रतिम आहे आणि या मुलाची युक्ती अप्रतिम आहे. दुसर्या यूजरने लिहिले की, ‘हा तिथे उपस्थित लोकांचा निष्काळजीपणा आहे, चुकून काही झाले असते तर मुलाला दुखापत होऊ शकली असती.’