सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. पोटच्या मुलांना आयुष्यभर सांभाळणारी आई संकटात सापडल्यावर मुलांना तिला मदत केल्याशिवाय राहता येत नाही. एका अडीच वर्षाच्या मुलानं सीडीवर काम करत असताना खांबाला लटकलेल्या आईचा जीव वाचवला. काम सुरु असताना अचानक शिडी खाली पडल्यावर आई खांबाला लटकते. आई संकटात असल्याचं पाहताचं चिमुकला क्षणाचाही विलंब न लावता खाली पडलेल्या शिडीला उचलून पुन्हा त्याच जागेवर ठेवतो. ही सर्व दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ ट्विटरवर तुफान व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

एक महिला शिडीवर चढून गॅरेजचा दरवाज्याचं काम करत असते. त्याचदरम्यान शिडी खाली पडते आणि ती महिला खांबाल लटकते. पण आपल्या आईला खांबवर लटकल्याचं पाहताच तिचा मुलगा तातडीनं धाव घेतो आणि शिडी उचलून पुन्हा त्याच ठिकाणी उभी करतो. त्यामुळे उंचावर लटकेल्या महिलेला शिडीवर पाय ठेवण्यास मदत मिळते. मुलाने वेळीच आईला मदत करु शकला नसता, तर त्याची आई जमिनीवर पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असती. पण त्या मुलानं धाडस करून त्याच्या आईचं प्राण वाचवलं. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लहान मुलं एव्हढी सतर्क असतात आणि बुद्धीच्या जोरावर घरच्या मंडळींना संकटात कशी मदत करतात? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो

नक्की वाचा – धक्कादायक! लठ्ठपणामुळं ब्राझीलच्या मॉडेलचा विमान प्रवास रोखला, Video शेअर करत मॉडेल म्हणाली, ” मी लठ्ठ आहे, पण…”

इथे पाहा व्हिडीओ

@tansuYEGEN नावाच्या एका युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच त्यांनी सुंदर कॅप्शन देत म्हटलंय, या दिवसाचा हिरो फक्त तो लहान मुलगा आहे. जो संकटात सापडलेल्या आईच्या मदतीसाठी लगेच धावला. त्याने स्वत: वजनदार शिडी उचलून त्याठिकाणी पुन्हा ठेवली. मुलाचं हे कृत्य कौतुकास्पद आहे.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनीही या मुलाला सलाम केला आहे. संकटात सापडलेल्या आईला मदत करणाऱ्या मुलावर इंटरनेटवर स्तुतीसमुनं उधळली जात आहेत.

Story img Loader