डान्स करायला कोणाला आवडत नाही. डान्स करता येत असो किंवा नसो प्रत्येकाला डान्स करताना जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. ज्यांना अप्रतिम डान्स करता येतो त्यांच्यासाठी या पेक्षा दुसरा कोणता आंनद असू शकत नाही. दुसऱ्या व्यक्तीला डान्स करताना पाहूनही आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येते म्हणूनच की काय सोशल मीडियावर रोज लाखो डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका चिमुकलीच्या सुंदर डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी चिमुकलीचे चाहते झाले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली ऐका दाजीबा या मराठी गाण्यावर अप्रतिम डान्स करत आहे. चिमुकलीने मराठमोळी वेषभूषा परिधान केली आहे आणि नाकात नथनी घातली आहे. गाण्याच्या तालावर चिमुकलीने भन्नाट डान्स करत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव नेटकऱ्यांना थक्क करत आहे. तिच्या मोहक अदा पाहून कोणीही तिच्या डान्सच्या प्रेमात पडेल.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर teambarkatarora नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हि़डीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी चिमुकलीचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट केले की ही चिमुकली एक्स्प्रेशन(हावभाव) क्विन आहे.

दुसऱ्याने कमेंट केली, “हिचे हावाभाव घायाळ करणारे आहेत.”

तिसऱ्याने कमेंट केली, “तिच्या हावभावंचे कौतुक करायला शब्दच नाहीत”

चौथ्याने लिहिले, “सर्वात गोंडस मराठी मुलगी!”

Story img Loader