सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीही सांगू शकत नाही. या प्लॅटफॉर्मवर दररोज काही ना काही व्हायरल होत असते आणि त्यातील काही ट्रेंडिंग न्यूजच्या हेडलाईनमध्येही येतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्याला खूप पसंती दिली जात आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलीने डान्स केलाय, पण चर्चा या व्हिडीओमधल्या कुत्र्याची होत असताना दिसून येतेय.
प्राण्यांवर प्रेम करणारे लोक अनेकदा इंटरनेटवर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहतात. आपण सर्वांनीच माकड, मांजर आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांना इकडून तिकडे उड्या मारताना नेहमीच पाहिलं असेल. ट्रेनिंगनंतर परफॉर्मन्स करणाऱ्या प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला स्टंट करताना पाहिलंय का? बहुतेक लोकांचं उत्तर नाहीच असेल. सध्या एका कुत्र्याचा स्टंट व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. खरं तर या व्हिडीओमध्ये मुलगी डान्स करताना दिसून येतेय. पण तिच्यासोबत थिरकणाऱ्या कुत्र्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : मस्ती मस्तीत रॉकेट पेटवला, पण तो उडत उडत बिल्डिंगमध्ये घुसला, पुढे जे झालं ते पाहा!
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात एक लहान मुलगी तिच्या पाळीव कुत्र्यासोबत काही अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे. कुत्रा हुशार आहे आणि एकही ठोका न चुकवता तो तिच्यासोबत स्टंट करतोय. या दोघांनी या स्टंटचा सराव करण्यात बराच वेळ घालवला आहे आणि त्यांनी सराव करून उत्तम पद्धतीने स्टंट सादर करण्यात यशस्वी होत असल्याचं पाहून सारेच जण आश्चर्य झाले आहेत. मागून बॅकग्राउंडमध्ये म्यूझिकचा आवाज ऐकू येत आहे. कुत्रा या लहान मुलीसोबत मजेशीर पद्धतीनं डान्स करताना दिसून येत आहे.
आणखी वाचा : नवरदेवाच्या जबरदस्त डान्सपुढे नवरी सुद्धा फिकी पडली; वऱ्हाडी सुद्धा झाले अवाक, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : सेम टू सेम श्रीदेवीसारखी दिसणारी तरूणी आहे तरी कोण ? VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण !
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं, की कुत्रा आपला डान्स एन्जॉय करत आहे. यावेळी त्याचे रिअॅक्शन पाहण्यासारखे आहे. यावेळी कुत्र्याचे स्टंट्स पाहणंही अतिशय मजेशीर आहे. जणू सुरू असलेलं म्यूझिक त्यालाही भरपूर आवडलं आहे.
buitengebieden_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २.२ मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी पाहिलंय. तर ३४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओमधल्या मुलीच्या डान्सपेक्षाही जास्त लोक कुत्र्याच्या स्टंटचं कौतुक करताना दिसून येत आहेत.