Viral video: मुलं देवाघरची फुलं, असं आपण नेहमी म्हणतो. कारण- ती नेहमी खरं बोलतात. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लहान मुलांचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. त्यांचा निरागसपणा सगळ्यांनाच भावतो. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. सगळीच लहान मुलं अभ्यास न करण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करीत असतात. मात्र, या चिमुकलीनं अभ्यास न करण्याचं असं कारण सांगितलं की, ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.
सोशल मीडियावर कायमच लहान मुलांचे फनी व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्यातील निरागसता आपण कायमच अनुभवत असतो सध्या अशाच एका कोल्हापूरी चिमुकलीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. रोजरोज अभ्यास करुन कंटाळलेल्या या चिमुकलीने आपल्या शिक्षकांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
व्हिडीओमध्ये शिक्षक लहान मुलीला, दिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी सांगत आहेत, त्यावर ती शिक्षिकेलाच बिन्धास्तपणे सांगते की, “कंटाळा येतोय ग मला अभ्यास करून मी एवढंच करणार आणि आपली आपली दप्तर भरणार आणि जाणार बया, नको उगा डोसक्याला ताप” असं ती तिच्या कोल्हापुरी शैलीत म्हणत आहे. शेवटी शिक्षिकाही चिमुकलीचं बोलणं एकून हसत आहेत. विद्यार्थिनीचं हे कोल्हापुरी शैलीतलं बोलण ऐकून तुम्हालाही हसू येईल.
पाहा व्हिडीओ
नेटकरी काय म्हणतात?
यावर आता नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलं, आपली शिक्षणपद्धती बदलावी लागेल. इतक्या लहान वयात आपण शिक्षणाचा दबाव आणू नये. तिनं जीवनाचा आनंद लुटला पाहिजे,” तर आणखी एकानं “खरंच आपल्याला जर रोज घरातील व ऑफिस मध्ये काम करून कंटाळा येतो तसेच मुलांना सुद्धा कंटाळा येतो. आपण समजून घ्यायला हवे. एक शिक्षक म्हणून मीसुद्धा मुलांची मनस्थिती समजू शकते. सकाळी लवकर उठणे क्लास ला जाणे नंतर शाळेत जाणे, परत घरचा अभ्यास करणे. मुलांना खेळायला मिळत नाही. त्या मुळे त्यांना कंटाळा येतो. आपण त्यांना समजून घेतले पाहिजे.” असं मत व्यक्त केलं. दुसरीकडे लहान मुलीचं हे बोलण ऐकून अनेकांना हसू अनावर झालं.