पुष्पा चित्रपटातील सामी सामी गाणे सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच या गाण्याने खूप प्रसिद्ध मिळवली. पार्टी, लग्न इत्यादी कार्यक्रमात हे गाणे गाजले. साऊथची अभिनेत्री रश्मिका आणि अभिनेता अल्लू अर्जुन यांनी या गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. सामी सामी या गाण्याचा सिग्नेचर मुव्ह करत अनेकांनी रिल्स देखील बनवले. आता गाण्यावर एका चिमुकलीचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या गोंडस मुलीने सामी सामी गाण्यावर डान्स करून सर्वांची मने जिंकली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चिमुकली मुलगी गाण्यावर एन्जॉय करत डान्स करताना दिसत आहे. गाणे गात ती सामी सामी गाण्यावर नाचत आहे. लोक या चिमुकल्या मुलीच्या नृत्याचे कौतुक करत आहे. या गाण्यावर इतर मुलेही मागे नृत्य करताना दिसत आहेत. ते पण छान नाचत आहेत. या चिमुकल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यास लोकांची पसंती मिळत आहे.
(Viral : लहानशा दरवाज्यातून निघण्यासाठी हत्तीने वापरली ही युक्ती, पाहा व्हिडिओ..)
तेजा नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने क्यूट असे लिहित मुलीच्या नृत्य कौशल्याचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. हजारो लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे.
रश्मिकाने केले कौतुक, म्हणाली..
चिमुकलीच्या नृत्य कौशल्याचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे. एकाने सो क्यूट असे लिहिले आहे. तर एकाने आपण या मुलीचे फॅन झाल्याचे म्हटले आहे. रश्मिका मंदानानेही या व्हिडिओवर कमेंट केली. मला या मुलीला भेटायचे आहे, असे ती म्हणाली.