GOMI-GOMI Dance Video: सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैयानी आपल्या इन्स्टाग्रामवर मनोरंजन जगताशी संबंधित व्हिडीओ आणि पोस्ट सतत शेअर करत असतात. याशिवाय तो अनेकवेळा असे व्हिडीओ पोस्ट करतो, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने इंटरनेट जगतात वर्चस्व गाजवतात. अलीकडेच विरल भयानीने दिल्ली मेट्रोमध्ये आपल्या क्यूट डान्सने लोकांची मने जिंकणाऱ्या एका लहान मुलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुलीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चला जाणून घेऊया काय आहे या व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियाच्या जगात नेहमीच काही ना काही ट्रेंड चालू असतो. हल्ली अनेक वर्षे जुने ‘गोमी-गोमी, गोमी’ हे गाणे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. यूजर्स या गाण्यावर आपले वेगवेगळे डान्स व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर शेअर करू लागले आहेत. अगदी लहान्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांवर या गोमी गोमी गाण्याची नशा चढली आहे. नुकतचं या गाण्यावर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. विरल भैयानीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये चिमुकलीने चालत्या मेट्रोत या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे ही मुलगी दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत असताना तिचे पालक तिला ‘गोमी-गोमी’ गाण्यावर डान्स करायला सांगतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, मेट्रोच्या सीटवर मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले आहेत. तिथे काही तरूण उभे आहेत.

आणखी वाचा : VIRAL : सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करणारी ‘ती’ वकील महिला नक्की कोण? ३ महिन्यांपूर्वीच भाड्याने घर घेतलं होतं…

चालत्या मेट्रोमध्ये अचानक ही चिमुकली गोमी गोमी गाण्यावर नाचू लागते. तिला नाचताना पाहून मागे उभे असलेल्या तरूणांपैकी दोन मुली बाजुला लपताना दिसतात. पण यातला मुलगा जागीच उभा राहून या गाण्यावर थिरकू लागतो. या व्हिडीओमध्ये चिमुकली डान्स करत असताना तिने तिच्या चेहऱ्यावर जे गोड एक्सप्रेशन्स दिले आहेत, ते पाहून लाखो लोक तिच्या प्रेमात पडू लागले आहेत. तिने केलेल्या डान्स स्टेप्स सुद्धा तिच्या एक्सप्रेशन्सइतकेच गोड आहेत.

आणखी वाचा : मेंढ्यांसारखे ‘बा-बा’ करणाऱ्या माणसांचा VIDEO VIRAL:, हावभाव पाहून पोट धरून हसाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : दुधाने मुलीचे पाय धुतले आणि तेच दुध प्यायले, बाप-लेकीच्या नात्याचा हा गोंडस VIRAL VIDEO पाहाच

हा व्हिडीओ viralbhayani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader