बाप लेकीच्या नात्याचं वर्णन शब्दात करणं कठिण आहे. प्रत्येक मुलगी ही त्यांच्या वडिलांसाठी एक परीच असते. कितीही संकट असली तरी आपल्या चेहऱ्यावरील ताण बाजुला ठेवून चेहऱ्यावर सतत हसू ठेवत कठोरातील कठोर पुरूष सुद्धा आपल्या लेकीसाठी कधी तिच्यासारखं लहान होऊन खेळतो-बागडतो, कधी तिच्यासाठी घोडा बनून आपल्या पाठीवर बसवून घरभर खेळू लागतो. सध्या अशाच एका बाप-लेकीचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बाप-लेकीच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, दोघे बाप लेक कॅमिला कॅबेलोच्या डोन्ट गो यट या गाण्यावर अप्रतिम डान्स स्टेप्स करताना दिसून आहेत. या व्हिडीओमधील वडिलांचं नाव पाब्लो असं असून मुलीचं नाव वेरोनिका आहे. हे दोघे बाप-लेक अनेकदा इन्स्टाग्रामवर एकत्र डान्स करतानाचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. या दोघांच्या डान्स व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. या व्हिडीओंमध्ये दोघेही सेम टू सेम डान्स स्टेप्स करत असतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एलियनसारखा दिसणारा मासा?, कपाळावर हिरवे डोळे आणि त्वचा काचेसारखी पारदर्शक! पाहून व्हाल हैराण

नुकतंच शेअर केलेल्या त्यांच्या नव्या व्हिडीओमध्ये दोघे घरातील वॉशरूमध्ये असलेल्या मोठ्या आकाराच्या आरशामध्ये पाहून एकसारखे डान्स स्टेप्स करत आहेत. हे दोघेही कॅमिला कॅबेलोच्या डोन्ट गो यट या गाण्यातील स्टेप्स फॉलो करत थिरकताना दिसून येत आहेत. एकही स्टेप्स न चुकवता ही लहान मुलगी तिच्या वडिलांसोबत नाचते. वडिलांच्या पावलांशी आपले पाऊल जुळवत ती मनसोक्तपणे थिरकते. हे दोघेही बाप-लेक जेव्हा एकाच वेळी एकमेकांसारखेच परफेक्ट डान्स स्टेप्स करतात, तेव्हाचे हे दृश्य पाहण्यासारखे असतात. या दोघांच्या नात्यातील गोडवा स्पष्टपणे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हातात आईचा फोटो… डोळ्यात अश्रू! या पाकिस्तानी नववधूची एन्ट्री पाहून तुम्ही भावूक व्हाल…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘बुलेट राजा’चा वाजवला बाजा! बुलेटवर नवरी शोधत होता, कानपूर पोलिसांनी १४ हजारांचे चलान पाठवले

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. वडिलांसोबत डान्स स्टेप्स करताना या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून सारेच जण या चिमुकलीच्या प्रेमात पडू लागले आहेत. त्याचपद्धतीने लहान चिमुकलीसोबत स्वतः लहान होऊन डान्स करणाऱ्या वडिलांवर देखील कौतुकाचा वर्षाव करण्यात येतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या ड्रामेबाज सापापुढे बडे बडे अभिनेते सुद्धा फिके पडतील, हात लावताच करतोय मेल्याचं ‘नाटक’

हा व्हिडीओ आतापर्यंत १ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तसंच १ लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडीओच्या कमेंटस सेक्शनमध्ये शेअर करताना दिसून येत आहेत.

Story img Loader