केरळ राज्य सध्या ओणम सणाच्या आनंदोत्सवात मग्न आहे. सणाचा उत्साह राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरला असून, सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या पारंपारिक सणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांची कासवू साडी. ही साडी म्हणजे केरळमधील महिलांसाठी मौल्यवान वस्त्र आहे,विशेषत: महत्त्वपूर्ण कार्यक्रमांसाठी.
दरम्यान, सध्या कासवू साडी नेसलेल्या चिमुकलीचा गोंडस व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही लहान मुलगी ही साडी नेसून चक्क स्केटिंग करताना दिसत आहे. चिमुकलीचा हा ओणम स्वॅग पाहून नेटकरी थक्क झाले आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी ही मुलगी फक्त पाच वर्षांची असून तिचे नाव आयराह आयमेन खान आहे. आयराहगने तिचे प्रभावी स्केटिंग कौशल्य दाखवले आहे जे पाहून प्रत्येक जण तिचा फॅन होत आहे. कोची येथील राहत असलेल्या फोटोग्राफर नवाफ शराफुद्दीन खान याने खाजगी स्केटपार्क लूप येथे हे फुटेज कॅप्चर केले आहे.
हेही वाचा – बहीण असावी तर अशी! रक्षाबंधननिमित्त भावाला दिली अमुल्य भेट, यकृताचा भाग दान करून वाचवला त्याचा जीव
हेही वाचा – हाजमोला चहाचा Viral video पाहून चहाप्रेमीं झाले नाराज, म्हणाले ”चहाचा अपमान…”
दहा दिवस चालणाऱ्या ओणम सणाचा मुख्य दिवशीच्या म्हणजेच तिरुवोनमच्या एक दिवस अगोदर शराफुद्दीनने हा मनमोहक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. आयराहची कमालीची स्केटिंग क्षमता, तिच्या पारंपारिक पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इंटरनेट या लहान मुलीच्या स्केटिंग कौशल्याच्या प्रेमात होते. तिने घातलेली कासवू साडी या व्हिडीओमध्ये मुख्य आकर्षण ठरत आहे.