सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. एखाद्याने सहज केलेली कोणतीतरी गोष्ट व्हायरल झाली आणि तो ट्रेंड सुरू झाला, असं घडल्याचं आपण अनेकदा पाहतो. अलीकडेच एका अतिशय गोंडस चिमुकल्या मुलीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी अगदी चिमुकली राणी दिसतीये. या मुलीने ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय सारखी वेषभूषा केलेली दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, ओहियोची रहिवासी जलेन सदरलँड हॅलोविनच्या दिवशी राणी एलिझाबेथ दोनच्या गेटअपमध्ये दिसली होती. तिचे काही फोटो तिच्या पालकांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या चिमुकलीचा हा फोटो लोकांच्या पसंतीस उतरला असून चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये, जलेन निळ्या रंगाचा ड्रेस, मॅचिंग मोठा ब्रोच आणि मोत्याची माळा परिधान करून दिसत आहे. तिचा लूक हुबेहूब राणी एलिझाबेथसारखा दिसतोय.
जलेन सुदरलँडचे हे फोटोज सध्या खूप लोकप्रिय होत आहेत. त्यानंतर तिची आई कॅटलिनने हे फोटो राणी एलिझाबेथला पाठवली. ज्यानंतर त्यांना राणीच्या लेडी-इन-वेटिंग, मेरी मॉरिसन यांच्याकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रात राणी एलिझाबेथच्या वतीने विंडसर कॅसल लिहिते की, “राणीची इच्छा आहे की आता तुमच्या पत्राच्या उत्तरात तुम्हाला एक पत्र लिहावे आणि त्या फोटोबद्दल तुमचे विशेष आभार मानले पाहिजेत.”
या पत्रात पुढे असे लिहिले आहे की, राणी एलिझाबेथ यांना जलेन सुदरलँडचा हॅलोवीन ड्रेस अप खूप आवडला. तिचा लूक बघून त्या खुश झाल्यात. यासोबतच ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी जलेन सुदरलँड यांच्या कुटुंबीयांना नाताळच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.