बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर. लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. याचाच प्रत्यय देणाऱ्या एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुंबई लोकलमधला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चालत्या लोकल ट्रेनच्या दाराजवळ एक वडील बसले आहेत. आपल्या लेकीसोबत ते ट्रेनमधून प्रवास करत असतात. ही लेक पित्याला आपल्या इवल्या इवल्याश्या हाताने फळ खाऊ घालताना दिसतेय. आयुष्यातला हा सर्वात गोड क्षण तिथून लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. बाप-लेकीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावूक झाले आहेत. आपल्या हाताने लेक मायेने वडिलांना फळ खाऊ घालताना पाहून प्रत्येक जण बाप-लेकीच्या नात्यावर व्यक्त होऊ लागलेत.
आणखी वाचा : अजब! उंच इमारतीवरून ही चिमुकली खाली पडली तरी जीव वाचला! असा कोणता चमत्कार घडला? पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या माकडाने मुलीला अशी घडवली अद्दल, पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ संकीसाक्षी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्या आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना एक सुंदर कॅप्शन देखील लिहिलीय. “असे क्षण जगायचे आहेत!” अशी कॅप्शन देण्यात आलीय. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडू लागलाय. आत्तापर्यंत या व्हिडीओला ४ 0लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ६८ हजार लाईक्स मिळाले आहेत. तसंच बाप-लेकीचे प्रेम पाहून यूजर्स भावूक झाले आहेत.