Mother-Daughter Fight for Brother Video : भाऊ आणि बहिणीचे नाते खूप खास आणि तितकेच निर्मळ असते. लहानपणी ते एकत्र राहतात, एकत्र खेळतात, एकत्र अभ्यास करतात आणि खूप भांडतात; पण काही वेळाने ते पुन्हा एकत्र येतात. बहीण-भाऊ आपापसांत कितीही भांडले तरी परकी व्यक्ती जर कोणी काही त्यांच्यापैकी कोणाला बोलली, तर मग ते एकमेकांसाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात; भले मग ती त्यांची आई का असेना. सध्या अशाच एका गोंडस भाऊ-बहिणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात आई आपल्या लहान मुलाला मारत असते. ते पाहून बहीण धावत येते आणि आईपासून त्याला वाचवते. इतकेच नाही, तर आईला पुन्हा माझ्या भावाला मारलंस ना, तर बघ, अशी धमकी देत ती रडू लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहान भावासाठी तिच्या आईशी भांडताना

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चार-पाच वर्षांची एक लहान मुलगी आपल्या लहान भावासाठी तिच्या आईशी भांडताना दिसत आहे. रडत रडत ती आईला म्हणते की, तू माझ्या भावाला मारलंस, तर मी माझ्या पप्पांना सांगेन की, ती तिच्या मुलाला मारत राहते. त्यावर आई म्हणते की, मग त्याला विचार की, तो सारखी माती का खातो. त्यावर रडत ती चिमुकली आईला म्हणते की, माझा भाऊ आहे… त्याला मारू नको. चिमुकलीला चिडवायला म्हणून आई म्हणतेय की, तुझ्या भावाला तुझ्याकडेच ठेव. त्यावर छोटी बहीण आपल्या लाडक्या भावाला मिठी मारते आणि प्रेमाने त्याचे चुंबन घेते.

VIDEO : कोण पाण्यानं धुतंय पंखा, तर कोण झोपून पुसतंय लादी; सोशल मीडियावरील दिवाळी साफसफाईच्या या मजेशीर मीम्स पाहून हसाल पोट धरून

VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”

भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम दाखविणाऱ्या या व्हिडीओवर लोक प्रेमाचा वर्षाव करीत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, या प्रेमाला कुणाचीही नजर लागू नये. तर दुसऱ्या युजरने लिहिले, हे प्रेम चिरंतन राहू दे. तिसऱ्या युजरने लिहिले की, मारू नका यार, का त्या मुलांना रडवत आहेस. अनेक युजर्सनीही या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या भावा-बहिणीबरोबरच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little girl fight with her mother for her brother netizens are showering love on this cute video sjr