Viral video: एखाद्याचा मूड खराब असेलतर ती व्यक्ती लहान मुलांचे व्हिडीओ पाहत असते. कारण त्यामुळे आपला मूड चेंज होत असतो. मुलांचे काही व्हिडीओ असे असतात की, काही लोकं पटकन फ्रेश होतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे लोकं लहान मुलांचे व्हिडीओ तयार करतात. नुकताचं एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतले मुलीचे हावभाव पाहिले तर कोणीही तिच्यावर इम्प्रेस होईल. तसेच ती तिच्या शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात असा परफाॉर्मन्स सादर करते की ऐकून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.

लहान मुले खूपच गोंडस आणि निरागस असतात. ते आजूबाजूला जे पाहतात ऐकतात ते लगेच आत्मसात करतात.तसेच आई-वडिलांनी जे सांगितलंय तसंच ते वागत असतात. अशाच एका चिमुकलीचा पहिलाच स्टेजवरचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये ती एक कविता सादर करतेय. ही कविता ऐकून तुमचाही मूड एकदम फ्रेश होईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिमुकली स्टेजवर माईकवर बोलत आहे, पण ती जे बोलतेय ते ऐकूम उपस्थित असलेली सगळी मंडळी हसून हसून लोटपोट झाली आहेत. आता तुम्ही म्हणाल अशी कोणती कविता तिनं सादर केलीय. तर चिमुकली म्हणते, “आणल्या बाई पाकुळ्या धरुन, दिले बाई नवऱ्याला तळून..नवरा गेला पळून आता काय करायचं रडून? घ्या बाई दुसरा करुन” अशा प्रकारचं तिचं फनी सादरीकरण पाहून तुम्हीही कौतुक कराल.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

हा व्हिडीओ anotherneha नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हे मला माझ्या भावंडांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवलं होतं जे मी शाळेत सादर केलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “स्वत:चं लेकरू रडतंय पण गौतमीबरोबर फोटो महत्त्वाचा” महिलेचा संतापजनक VIDEO होतोय व्हायरल

या व्हिडीओला १२७,६९१ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “किती गोडंस मुलगी आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहलं की, “लहान मुलं अशीच असतात त्यांना जे शिकवलं जातं तेच ते बोलतात करतात, हीच त्यांची निरागसता आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “बेटा, आज तू लग्न केलेस तर उद्या तू म्हणशील की, तुला घटस्फोट घ्यायचा आहे”. या व्हिडीओवर लाइक्सचा पाऊस पडत आहे.

Story img Loader