आजची लहान मुलं-मुली ही फक्त म्हणायला लहान आहेत, हल्लीच्या मुला मुलींना आता मोठ्यांसारखीच समज असते. कधी कधी ते अशा गोष्टी करतात, ज्याची कुणी अपेक्षाही केलेली नसते. ही भावना मुलांमध्ये अधिक दिसून येते. ते न घाबरता एकमेकांना मदत करतात आणि आनंदी देखील असतात. सोशल मीडियावर तुम्हाला लहान मुलांचे वेगवेगळे व्हिडीओ पहायला मिळत असतात. यातील काही व्हिडीओ हे भावनिक आणि काही मजेदार असतात. काही व्हिडीओ हे आपल्याला आयुष्यातील धडे शिकवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी दुसऱ्या मुलीला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की मुलांना निर्मळ मनाचे असं का म्हणतात?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी खाली जमिनीवर बसली आहे आणि दुसरी मुलगी तिच्या पाठीवर पाय ठेवून सायकलवर बसण्याचा प्रयत्न करत आहे. अखेरीस, तिच्या बहिणीच्या ‘आश्चर्यकारक’ मदतीने ती सायकलवर बसते आणि मग तिची मोठी बहीण उठून सायकलला धक्का देण्यास सुरूवात करते. ही मोठी बहिण आपल्या लहान्या बहिणीला सायकल देखील चालवायला शिकवू लागते. एक बहीण दुसऱ्या बहिणीला पुढे जाण्यासाठी मदत करत आहे. म्हणून हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या काळजाला भिडला आहे.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण

आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी सिंह थेट झाडावर चढला, जंगलाचा राजा घाबरला का?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पांढऱ्या रंगाचा झेब्रा कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. या कॅप्शनमध्ये त्यांनी एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. ‘खाली वाकणे, दडपणाखाली लहान्यांना वर आणण्यासाठी मदत करणे, पाठबळ देणे आणि पुढे जाण्यासाठी विश्वास देणे म्हणजे मोठेपणा’ असं त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अवघ्या १९ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे.

त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘प्रेमाला ना वय असतं ना जात, ते परिस्थितीनुसार प्रकट होत असतं’, तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ‘मोठ्यांचे काम लहानांना सोबत घेऊन चालणं असतं. म्हणजेच मोठेपणा.