Viral video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तरुणीचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. त्यात लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली.

अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच चिमुकलीचा जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे. लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घुंगरांचे बोल…ढोलकीचा ताल…घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या चिमुकलीनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.

कोणतंही काम सोपं नसतं, पण इच्छाशक्ती प्रबळ असल्यास, कोणतंही कार्य सोपं होऊ शकतं. एक काळ होता, जेव्हा डान्स करणारी किंवा गाणं गाणारी लहान मुलं फार कमी दिसायची. परंतु, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लहान मुलांचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. यामुळे त्यांच्या टॅलेंटला एक मोठं व्यासपीठ मिळालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” या गाण्यावर या चिमुकलीनं भन्नाट लावणी सादर केली आहे. तिचे एक्स्प्रेशन आणि डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओमध्ये ते आपली कला दाखवत आहेत आणि सर्वांनाच त्यांच्या टॅलेंटने आश्चर्यचकित करत आहेत. सध्या एका अशाच शाळेतील चिमुकलीचा डान्स व्हायरल होतोय. या चिमुकलीने आपल्या नृत्याच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रगल्भ नृत्यकौशल्यानं एक से एक स्टेप्स करीत आहे, ज्यामुळे तिला अनेक लोकांनी पाहून तिचं कौतुक केलं आहे.

Story img Loader