रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही देखील असे अनेक व्हिडीओ नक्कीच पाहिले असतील. पण सध्या असा एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या अंगावरून गाडी गेली तर त्या व्यक्तीचा मृत्यू होईल किंवा गंभीर दुखापत होईल हे साहजिकच आहे. पण व्हायरल होत असलेल्या अपघाताच्या व्हिडिओमध्ये लहान मुलगीच्या अंगावरून गाडी गेली असतानाही ती दुसऱ्याच क्षणी उठून उभी राहिली आणि पळू देखील लागली. देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. ते या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगी सायकल चालवत असताना समोरून कार येते. अचानक वळणावर मुलगी आल्याने समोरून येणाऱ्या कारलाही कंट्रोल होत नाही आणि ती कार त्या मुलीला उडवते. गाडीच्या धडकेने मुलगी खाली पडते आणि कार तिच्या अंगावरून जाते. कारच्या पुढचं चाक तिच्या अंगावरून गेल्याच व्हिडीओमध्ये दिसत आहे. मागचे चाक अंगावर येण्याआधीच कार थांबते. मात्र, थोड्याच वेळाने ती मुलगी उठते आणि धावू लागते. चाक अंगावरून जाऊनही तिला कोणतीही दुखापत झालेली दिसत नाहीये. उलट ती भरभर धावताना दिसत आहे. खरं तर हा व्हिडीओमध्ये चमत्कारच घडला आहे.

( हे ही वाचा: लग्नातील पाहुण्यांचे कृत्य पाहून अचानक बंद करावा लागला कारंजा; नेमकं काय घडलं पाहा हा Viral Video)

चिमुरडी कार अपघातातून कशी वाचली ते एकदा पाहाच..

( हे ही वाचा: स्कूल बसमधील विंडो सीटवरुन मुलगा-मुलगीची तुंबळ हाणामारी; दोघांनी लगावली एकमेकांच्या कानशिलात,Video होतोय व्हायरल)

हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जाको राखे सैयां मार से ना कोई’ अशा अपघातात मुलगी वाचली यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पालक आणि वाहन चालक दोघांनीही अत्यंत काळजी घेतली, ज्याचा परिणाम मुलीसाठी जीवघेणा ठरू शकतो. ९ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत १० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘आजकाल बहुतांश अपघात निष्काळजीपणामुळे होत आहेत’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘याला चमत्कारच म्हणावे लागेल’