Little Girl Dance Video: सध्या सोशल मिडियावर एका चिमुरडीचा डान्स करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही चिमुरडी एका शाळेमध्ये असलेल्या कार्यक्रमा दरम्यान भन्नाट डान्स करताना दिसत आहे. ही चिमुरडी न लाजता बिनधास्तपणे गाण्यावर ठुमके देत आहे. तिचा हा डान्स पाहून इतर शिक्षकही टाळ्या वाजवत डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत. कार्यक्रमात जमलेली इतर मुलं देखील तिचा डान्स बघून जोरजोरात टाळ्या वाजवत तिला प्रोत्साहन देत आहेत. या लहान मुलीने केलेल्या डान्सला सोशल मिडियावर भरपूर पसंती मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान चिमुरडी शाळेच्या गणवेशात राजस्थानी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शाळेच्या मैदानावर जमलेले शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक तिचा डान्स बघताना दिसत आहेत. ही चिमुरडी गाण्यावर खूपच सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिने डान्स करताना दिलेले ठुमके पाहून शिक्षक आणि जमलेले विद्यार्थी मोठमोठ्याने टाळ्या वाजवत आहेत. त्याचसोबत बरेच शिक्षक तिच्या डान्सचा व्हिडिओ शूट करत आहेत. या चिमुरडीने केलेल्या डान्सला सोशल मिडियावर भरपूर पसंती मिळत आहे.
( हे ही वाचा: Video: आयटम सॉंगवर महिलेचा भन्नाट डान्स; चेहऱ्यावरील ‘ती’ अदा पाहून सासूने दिलेली प्रतिक्रिया पाहाच)
चिमुरडीचा भन्नाट डान्स एकदा पाहाच..
( हे ही वाचा: Video: अशी गर्लफ्रेंड नको रे देवा! बाईकवरून फिरत होतं जोडपं, पोरीने कॅमेरा सुरू केला अन् तितक्यात…)
हा व्हिडिओ सोशल मिडियावर ‘जिंदगी गुलजार है’ या ट्विटर अकाऊंट वरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडिओला आतापर्यंत ४७ हजारांहून अधिक व्हयूज मिळाले असून अनेकजण हा व्हिडिओ शेअर देखील करत आहेत. तसच काहीजण यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. चिमुरडीने केलेला डान्स बघून लोक तिचे कौतुक करत आहेत.