सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होतात. त्यातील पाळीव प्राण्यांचे अनेक गोंडस व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. प्राणीप्रेमींसाठी हे व्हिडीओ दिवसभराचा ताण विसरण्यासाठी मदत करणारे ठरतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी कुत्र्यासोबत लपंडावाचा खेळ खेळत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या घरातील पाळीव कुत्र्याला लपंडावाचा खेळ समजवुन सांगत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तिने समजावल्याप्रमाणे हा कुत्रा त्याच्यावर डाव असल्याने भिंतीवर हात आणि डोके ढेवुन, तिला लपण्यासाठी वेळ देतो. काही वेळाने तिला शोधायलाही जातो. अगदी माणसांप्रमाणे या कुत्र्याला हा खेळ खेळताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाहा व्हायरल व्हिडीओ.
आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…
व्हायरल व्हिडीओ:
या गोंडस खेळाने नेतकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. या व्हिडीओला १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.