बाप लेकीच्या नात्याचं वर्णन शब्दात करणं कठिण आहे. प्रत्येक मुलगी ही त्यांच्या वडिलांसाठी एक परीच असते. त्यातल्या त्यात वडील जर पेशाने पोलीस तर त्यांची मुलं केवळ त्यांना ड्यूटीवर जाताना दिसून येतात. एकदा वडील कामावर गेले की घरी कधी येतील याचा नेम नसतो. कधी कधी मग खाकी वर्दीतले हे वडील जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांची लहान मुलं त्यांची वाट बघून बघून झोपूनही जातात. कितीही संकट असली तरी आपल्या चेहऱ्यावरील ताण बाजुला ठेवून चेहऱ्यावर सतत हसू ठेवत कठोरातील कठोर पोलीस पिता सुद्धा आपल्या लेकीसाठी कधी तिच्यासारखं लहान होऊन खेळतो-बागडतो, कधी तिच्यासाठी घोडा बनून आपल्या पाठीवर बसवून घरभर खेळू लागतो. सध्या अशाच एका बाप-लेकीचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये आयपीएस पित्याचा त्याच्या लेकीने मेकअप केलाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.
बाप-लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नातं आहे. या अनमोल प्रेमाचं प्रतिबिंब दिसणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटीशी चिमुकली आपल्या IPS पित्याच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्यूट व्हिडीओने हजारो लोकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडीओ मुलीचे वडील आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. आयपीएस अधिकारी विजयकुमार हे तामिळनाडू पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेत एसपी आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : महाकाय अजगर रस्ता ओलांडत होता, सर्व वाहने थांबली पण हा काही थांबला नाही
या व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या वडिलांसोबत बसलेली दिसत आहे. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की या चिमुकलीचं वय खूप लहान आहे आणि तिचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. तिच्या जवळ इतर अनेक मेकअपचे साहित्य दिसून येत आहेत, हे साहित्य तिला तिच्या वडिलांसाठी वापरायचे आहेत. आयपीएस पित्याच्या ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर ती वडिलांशी बोलताना दिसून येत आहे. दोघांचे सुंदर बंध व्हिडीओमध्ये दिसत आहेत. बाप-लेकीच्या नात्याचा हा प्रेमळ व्हिडीओ पाहून लोक भारावून जात आहेत.
आणखी वाचा : जेव्हा वाघाच्या पिल्लाने आईला मिठी मारली…, हा VIRAL VIDEO जिंकतोय लाखो लोकांची मनं
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : हॉटेलमध्ये तंदुरी रोटी खाण्यापूर्वी हा VIRAL VIDEO एकदा पाहा, कॅमेऱ्यात कैद झालं हे किळसवाणं कृत्य
“घरात लेकी आणि मुले सर्व सुख आणतात. माझ्यासोबत माझी मुलगी निला.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो रिट्विट्स आणि २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करत बाप-लेकीवर प्रेमाचा वर्षावर करताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : खादाड नवरीबाई! काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण चायनीज स्नॅक्स खाण्याचा मोह काही आवरला नाही
एका यूजरने कमेंट करत लिहिले की, बाप-लेकीची ही जोडी खूपच अप्रतिम आहे. दुसर्या यूजरने लिहिले की, “हा व्हिडीओ खरोखरच क्यूट आहे, असे व्हिडीओ फारच कमी पाहिले जातात.” तिसऱ्या यूजरने लिहिले की, सर माझी मुलगी रोज माझ्यासोबत असं करते आणि जर मी तिच्यासोबत वेळ घालवला नाही तर तिला खूप राग येतो.” आणखी एका दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिलं की, “एका आयपीएस अधिकाऱ्याला लिपस्टिक लावण्याची हिंमत केवळ त्याची मुलगीच करू शकते.”