अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच. मात्र काही मुलांवर खेळण्या-बागडण्याच्या वयात जबाबदाऱ्या येऊन पडतात. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. असाच एक दादर स्टेशनवरील चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खेळण्या-बागडण्याच्या वयात कष्टाचे चटके

आजच्या युगात जीवन प्रवास करणे हा सोपा नाही. जीवन म्हणजे रोज एक नवे युद्धच आहे.. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला पोहचत आहे. अशातच शिक्षण आणि घर चालविणे अवघड झाले आहे. अशातच दादर स्टेशन बाहेर भाजी विकत बसेलल्या एका चिमुकलीकडे सगळ्यांच्याच नजरा जात आहेत. एवढ्या कमी वयात परिस्थितीमुळे या चिमुकलीवर कष्ट करण्याची वेळ आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही चिमुकली एका ठिकाणी बसून भाजांचे दर ग्राहकांना सांगून त्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. काम केलं नाही तर रात्री जेवायला मिळणार नाही, असा काहीसा भाव तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

दादरला अनेक अनेक लोकं आपल्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्यवसाय करायला बसतात, मात्र त्यांची गरज पैसे कमवणे नव्हे तर जगण्यासाठी असते. त्यामुळे अशा लोकांकडून खरेदी करताना भाव करु नका.  

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – काही सेंकदात रेस कारचा होतोय रोबोट! Transformer Car पाहिलीत का? आनंद महिंद्राही झाले थक्क; पाहा Video

एका युजरने लिहिले, “कमी वयात अंगावर जबाबदारी आल्यामुळे इच्छा नसताना मोठं व्हावं लागतं”, तर एका युजरने लिहिले, “खूप मेहनती मुलगी आहे.” अनेक युजर्सनी या मुलीच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले आहे.”