सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांचं मन निर्मळ असतं. लहान मुलं अनेकदा असं काहीतरी करतात, ज्यामुळे त्यांची निरागसता स्पष्ट अधोरेखित होते. हल्लीची लहान मुलं खूप टँलेंटेड असतात. टीव्हीवर अनेक असे शो आहेत जिथे लहान मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. या शोमधून अनेक बाल कलाकार जगासमोर येतात. आताचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. आई वडील अगदी जन्मलेल्या बाळाचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर टाकतात. त्यानंतर त्या बाळाचे अनेक गोष्टींचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भुरळ घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू एक चिमुकली आईसोबत कन्नड भाषेमध्ये गाणे गातं म्हणत आहे. प्रसिद्ध कवी के. एस. नृसिंग स्वामी यांची ही कविता आहे. पल्लवागाला पल्लवीयाली या कवितेचं गायण करत असतानाचा व्हिडीओ खुद्ध पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलीचं टॅलेंट पाहून नेटकऱ्यांसह मोदीही अवाक् झाले आहेत. नृत्य, संगीत आणि क्रीडा या सारख्या इतर अॅक्टिव्हिटी वाढल्या आहेत. लहानपणापासूनच एखादी गोष्ट मुलांना यावी असा आग्रह आई वडिलांचा दिसून येतो. या लहान मुलीचं टॅलेंट अनेकांना आवडलं आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – “२८ हजारांचा एक स्वेटर, बायको म्हणाली…” नरहरी झिरवळांनी सांगितला जपानमधला किस्सा

हा व्हिडीओ ट्वीटरवर Ananth Kumar @anantkkumar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “हा व्हिडिओ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. असामान्य प्रतिभा आणि सर्जनशीलता. शाल्मलीला खूप खूप शुभेच्छा” असं पंतप्रधानांनी लिहिलंय. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ४७ हज़ार लोकांनी पाहिला आहे. इतक्या लहान वयात त्या मुलीचं टॅलेंट पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little girl singing and playing harmonium pm modi share video on social media srk
Show comments