Viral video: संस्कार म्हणजे शिस्त, थोरमोठ्यांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी, परोपकारी. असं म्हणतात, कुंभार जसं मातीच्या गोळ्याला आपल्या हातातील कौशल्याने सुंदरसा आकार देतो व मग त्यापासुन कधी मातीचा घडा बनतो व तो पाणी शितल बनवतो आणि तहानलेल्याची तहान भागवतो तर कधी पणती बनुण प्रकाश देते. तसेच लहान मुलांना शक्य तेवढे चांगले कौटुंबिक वातावरण व उत्तम संस्कार मिळाल्यास तो चांगला व्यक्ती नक्कीच होतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलांना चांगले संस्कार देणे हे आईवडीलांच्या हातात असते. चांगले संस्कार मिळालेले मुले आयुष्यात पुढे चांगली व्यक्ती होतात. त्यांना लोक त्यांच्या माणुसकीमुळे ओळखतात. ते इतरांना मदत करायला नेहमी धावतात. इतरांबरोबर प्रेमाने व आदराने वागतात. सोशल मीडियावर माणुसकी व संस्कार दर्शवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणारे आचार आणि विचार म्हणजेच संस्कार. गरीब असो वा श्रीमंत संस्कार हे विकत घेता येत नाहीत. हे मोठ्यांकडून लहानांकडे येत असतात. लहान मुलं आपल्या आजूबाजूला जे जे घडतं त्याचं निरिक्षण करत असतात आणि त्याचेच अनुकरण करत असतात. कधी कधी ही मुलं आजूबाजूला पाहिलेल्या गोष्टीचे नकळत अनुकरण करताना दिसतात. दरम्यान अशाच एका चिमुकलीनं एका कृतीनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिकंली आहेत.

गरीब असो वा श्रीमंत संस्कार हे विकत घेता येत नाहीत. हे मोठ्यांकडून लहानांकडे येत असतात. लहान मुलं आपल्या आजूबाजूला जे जे घडतं त्याचं निरिक्षण करत असतात आणि त्याचेच अनुकरण करत असतात. कधी कधी ही मुलं आजूबाजूला पाहिलेल्या गोष्टीचे नकळत अनुकरण करताना दिसतात. दरम्यान अशाच एका चिमुकलीच्या एका कृतीनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिकंली आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, देव बाप्पा दिसला की किंवा रोजच्या रोज देवाच्या पाया आपण पडतो. सोबतच घरातील मोठी माणसंही घरातल्या लहान मुलांना देवबाप्पा कर, डोकं टोक, पाया पड असं सांगत असतात. अशातच जे अगदीच लहान मुलं असतात ज्यांना नीट बोलताही येत नाही अशी मुलं अनुकरण करुन तीच गोष्ट पुन्हा करतात. अशीच एक चिमुकली देव्हाऱ्याच्या समोर उभी राहून हात जोडून उभी आहे. याचाच अर्थ लहान मुलं आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असतात मग ते चांगलं असो की वाईट.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ punekar_in_hyderabad नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत “शेवटी संस्कार महत्त्वाचे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं “मला नाही वाटत आता इथून पुढच्या पिढीमध्ये असं काही बघायला मिळेल” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader