सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ आहेत जे तुम्हाला हसायला लावतात. तर असे काही व्हिडिओ आहेत जे तुम्हाला रडवतात. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला राग येतो. तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा मूड चांगला होतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक ८ वर्षांची मुलगी रॅम्पवर चालताना आहे. पण रॅम्पवर पोहोचताच ती अचानक पडते. पण जे घडते ते पाहून तुम्हीही टाळ्या वाजवू लागाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिमुकलीचा आत्मविश्वास पाहून प्रेक्षकांना वाजवल्या टाळ्या

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ८ वर्षांची मुलगी एका फॅशन शोसाठी रॅम्पवर चालत आहे. स्टेजवर चालायला येताच ती अडखळते आणि पडते. मुलीला वाईट वाटलं असावं असं लोकांना वाटतं. आता ती रॅम्पवर चालणार नाही आणि परत जाईल असे सर्वांना वाटते पण असे अजिबात होत नाही. चिमुकली पडल्यानंतरही आजिबात घाबरत नाही. आत्मविश्वासाने उठते आणि अतिशय हुशारीने रॅम्प वॉक करते. ८ वर्षांच्या मुलीचा हा आत्मविश्वास पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून चिमुकलीला प्रोत्साहन दिले. रॅम्पवर चालणाऱ्या या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ढोल ताशाच्या तालावर नाचणारा हत्ती कधी पाहिला आहे का? नसेल तर ‘हा’ Viral Video एकदा बघाच!

हेही वाचा – “GPSच्या भरवशावर राहणे पडले महागात!” नदीवरील लाकडी झुलत्या पुलावर अडकली महिलेची कार

रॅम्प करणाऱ्या चिमुकलीचे लोकांनी कौतुक केले

हा व्हिडिओ व्हायरल होत असून @geethu.sajikumar या नावाने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत जवळपास १४ लाख लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘काय आत्मविश्वास आहे.’ आणखी एका युजरने ‘ती एक स्टार आहे’ अशी कमेंट केली आहे. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, “कृपया मुलांना अशा कार्यक्रमात सहभागी होण्यापासून मुक्त करा. . त्यांच्यातील बालपण राहू द्या.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little girl walks beautifully on the ramp with confidence after falling see viral video video snk