सारा अली खान आणि धनुष यांच्या अतरंगी रे हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चाहते आणि फॉलोअर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळवल्या. चित्रपटातील गाण्यांना, विशेषत: ‘चका चक’ या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मुख्यतः सारावर चित्रित केलेले हे गाणे रिलीज झाल्यानंतर चाहते आणि फॉलोअर्समध्ये खूप पसंत करण्यात आले. गाण्याची क्रेझ एवढी आहे की लोक अजूनही ते ऐकणे थांबवू शकत नाहीत. आता चका चक वर डान्स करणाऱ्या एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिची मनमोहक एक्सप्रेशन निश्चितपणे व्हिडीओचे मुख्य आकर्षण आहे, ज्याने आतापर्यंत २ दशलक्षाहून अधिक व्हूज मिळवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अव्याना केनिशा नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही चिमुकली एलसीडी स्क्रीनसमोर उभी राहून प्रत्येक स्टेप्सची कॉपी करताना दिसते. तिच्या प्रत्येक स्टेप्स बरोबर मॅच होत आहेत.

(हे ही वाचा: हजारो फूट उंचीवर बंद पडले हेलिकॉप्टर, इंजिन सुरू करण्यासाठी पायलटने हवेतच बाहेर येऊन…;बघा Viral Video)

(हे ही वाचा: Viral: जास्त खाल्ल्यानंतर मांजरीची झाली ‘अशी’ अवस्था, Video बघून तुम्हाला हसू आवरणार नाही)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

तिच्या या डान्सच्या प्रेमात नेटीझन्स पडले आहे. हा व्हायरल व्हिडीओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. कमेंट्समध्ये “गोंडस”, “गोड” आणि “आश्चर्यकारक” सारख्या शब्दात तिचं कौतुक केलं जात आहे.

तुम्हाला कसा वाटला या चिमुकलीचा डान्स?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Little girls dance on song chaka chak from atrangi re video goes viral ttg