Viral video: कुंभार जसं मातीच्या गोळ्याला आपल्या हातातील कौशल्याने सुंदरसा आकार देतो व मग त्यापासुन कधी मातीचा घडा बनतो व तो पाणी शितल बनवतो आणि तहानलेल्याची तहान भागवतो तर कधी पणती बनुण प्रकाश देते.तसेच लहान मुलांना शक्य तेवढे चांगले कौटुंबिक वातावरण व उत्तम संस्कार मिळाल्यास तो चांगला व्यक्ती नक्कीच होतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा त्यांना असं काही बोलताना ऐकलं असेल ज्याने तुम्ही भावूक झाला असाल. सोशल मीडियावर लहानग्यांच्या पराक्रमाचे अनेक व्हिडीओ फिरत असतात. आपण नेहमी म्हणत असतो ‘मुले देवाघरची फुले’ लहान मुलं किती निरागस असतात, मात्र कधी कधी मोठ्यांनाही लाजवेल असं काम लहान मुलं नकळत करुन जातात. बऱ्याच वेळा आपल्याला मुलांमध्ये देवाचे अस्तित्व जाणवते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असेच काहीसे दिसले आहे.

निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी अनेक वेळा असं काही तरी बोलतात किंवा करतात की आपण सगळे अवाक् होतो. यांच्यासाठी ना कोणी मोठा ना कोणी लहान, ना कुठली जात, श्रीमंत काय आणि गरीब काय यांच्यासाठी सगळं एक सारखं असतं. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेत एक लहान मुलगी प्रार्थना म्हणत आहे. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना, ही प्रार्थना लहान मुलगी म्हणत आहे, यावेळी तिचा निरागसपणा, डोळे मिटून केलेली प्रार्थना पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/iAkankshaP/status/1904145064596570242

हा व्हिडिओ @iAkankshaP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ४ लाख लोकांनी पाहिला आहे. यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले…शेवटी संस्कार महत्त्वाचे. दुसऱ्या युजरने लिहिले..निरागस