प्रत्येकामध्ये काही नाही काही कौशल्य असते. प्रत्येकाकडे काही ना काही कलागुण असतात. योग्य वयात ते ओळखून ही कौशल्य जोपासली किंवा कलागुण आत्मसात केले तर असे लोक आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. आपल्या मुलांमध्ये असलेले योग्य कलागुण- ओळखणे आणि ते जोपसण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. फार कमी लोकांना असे पालक भेटतात. पण काही पालक असे असतात जे नेहमी आपल्या मुलांना साथ देतात. ही मुले अत्यंत भाग्यशाली असतात आणि ते आयुष्यात मोठे ध्येय साध्य करू शकतात. अशाच एका चिमुकलीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ७ चिमुकल्या जलपरीने नवा विक्रम केला आहे ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती समुद्रामध्ये पोहताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” शिवकन्या! उरण तालुक्याची जलपरी वयाच्या सातव्या वर्षी पूर्ण केला घारपुरी ते गेटवे ऑफ इंडिया १२ किमतीचा सागरी प्रवास फक्त ६ तासांत पूर्ण”
होय! तुम्ही योग्य तेच वाचत आहात. या सात वर्षाच्या मुलीने घारापुरी बंदर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तास ५ मिनिटात पोहून पूर्ण केले आहे. उसळत्या लाटांवर स्वार होत चिमुकलीने हा प्रवास पूर्ण केला आहे. या चिमुकलीचे नावा परिधी प्रमोद घरत असे आहे आणि उरण तालुक्यातील फणसवाडी येथे राहते. ती एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे जीने आपली जलतरणाची आवड जोपासली आहे. नुसती आवड जोपासलीच नाही तर त्याचा वापर करून नवा विक्रम रचला आहे. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तिने हे शक्य करून दाखवले आहे. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परिधीच्या पालकांनी तिचे कौशल्य ओळखले आणि ते जोपसण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले त्यामुळे तिने आज ही कामगिरी केली आहे. परिधीसह तिच्या आई-वडीलांचेही कौतुक होत आहे.
परिधीचे व्हिडीओ अनेकांनी शेअर केले आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिचे कौतुक केले. एकाने लिहिले की, परीने आज उरण तालुक्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उचांवलं आहे तर ही आई आहे आमच्या महाराष्ट्राची रणरागिणी!”
दुसऱ्याने कमेंट केली की, गर्व करण्यासारखा पराक्रम केला या छोट्या चॅम्पियनने, पूर्ण उरण तालुक्याला खूप खूप शुभेच्छाच, तुझा अभिमान आहे परी!
तिसऱ्याने कमेंट केली की, “अशक्य देखील शक्य करू इच्छिते ती म्हणजे फक्त जिद्द आणि या चिमुकलीमध्ये ती कुटून कुटून भरलेली दिसत आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. अजून बरेच विक्रम परी परत पूर्ण करेल. हार्दिक अभिनंदन”