सोशल मीडियावर लहान मुलांचे आणि मुलींचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. हल्लीची काही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रतृ मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंमध्ये लहान मुलं नवनवीन रील्स बनवताना दिसतात, तर कधी डान्स करताना दिसतात; तर काही व्हिडीओ त्यांच्या नकळत काढण्यात आलेले असतात.
लहान मुलं अनेकदा मोठ्यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक गोष्टी शिकत असतात. काही गोष्टींची आवड अगदी लहानपणापासूनच त्यांना लागते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात ते खरंय. लहानपणीच अनेक मुलांचे कलागुण दिसू लागतात. सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक शाळकरी मुलगी जेसीबी चालवताना दिसतेय.
हेही वाचा… काकांचा नाद करायचा नाही ! हळदीत काकांनी धरला जबरदस्त ठेका, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक
मुलीचा छंद लय भारी
सोशल मीडियावर व्हायरल झालेला चिमुकलीचा हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी जेसीबी चालवताना दिसतेय. मुलीचा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. अगदी लहान वयात मुलीला हा छंद लागल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला आहे.
मुलीचा हा व्हिडीओ @karan_rathod_8821 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कमी वयात लागलेला छंद..!, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल दोन दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे फक्त शेतकऱ्याची मुलगी करूच शकते… ताई सलाम तुझ्या या कलेला.” दुसऱ्याने, “वारसात मिळालेली संपत्ती वाया जाऊ शकते; पण कला कधीच नाही,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “तिने सिद्ध केलं की, मुलगी काहीही करू शकते.” एकाने, “खूपच छान कला आहे.आयुष्यात खूप मोठी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशी कमेंट केली.
© IE Online Media Services (P) Ltd