Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक लातूरमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा भयंकर अपघात लातूरमध्ये आष्टा मोड टोल नाक्याजवळ झाला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एका बाईक चालकाची शिक्षा बसमध्ये असणाऱ्या ४० प्रवाशांना भोगावी लागली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा यामध्ये चूक कुणाची?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लातूरमध्ये आष्टा मोड टोल नाक्याजवळ रस्त्यावर दोन्ही बाजूनं वाहतूक सुरु आहे. यावेळी एक बाईक चालक रस्त्याच्या कडेनं हळू हळू पुढे येताना दिसतोय. तर रस्त्यावर इतर गाड्यांची वाहतूक सुरु आहे. यावेळी एक बस भरधाव वेगात रस्त्यावर येताना दिसतेय, तेवढ्यात हा बाईक चालक अचानक रस्त्यावर युटर्न घेण्यासाठी वळतो. यावेळी भरधाव वेगात असलेल्या बसच्या समोरच हा बाईक चालक येतो त्यामळे बसचालक बस दुसरीकडे वळवतो आणि भयंकर अपघात होतो. बाईक चालकाला वाचवण्यासाठी तो वेगात असलेली बस बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो आणि याचवेळी बस पलटी होते. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. एका चुकीच्या युटर्नमुळे काय होऊ शकतं ते या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या अपघाताची थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. video_creator__4545 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. एकानं म्हंटलंय, “बस ड्राइवरने जर त्या टू व्हीलर वाल्याला उडवले असते तर गाडीवरील दोघे जण गेले असते पण त्या दोघांना वाचवण्यासाठी बसमधील ४० प्रवाशांच्या जिव धोक्यात गेला… याला जबाबदार कोण? हायवेवर बाईकवाले गाडी नीट चालवत नाहित. सर्विस रोड पट्टा असून देखील गाडी रोडच्या मधून चालवतात आणि वरून मोठ्या गाडी वाल्याला बोलतात तुला दिसत नाही का?पण त्या बाईक वाल्यांना मोठी गाडी का नाही दिसत?”